Breaking News : जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप, राष्ट्रवादीच्या मोठ्या युवा नेत्याचा भाजपात प्रवेश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बुधवारी जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडण्याची खेळी खेळली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मासा गळाला लावला आहे. भाजपच्या या इनकमिंग मोहिमेमुळे राष्ट्रवादी अर्थात आमदार रोहित पवार यांना जोरदार धक्का बसला आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक महत्वाचे नेते, कार्यकर्ते व गावोगावचे सरपंच भाजपात दाखल होत आहे. भाजपने हाती घेतलेल्या या मोहिमेचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसू लागला आहे. राष्ट्रवादीत सुरु झालेली गळतीमुळे राष्ट्रवादी सध्या बॅकफूटवर ढकलली गेली आहे.
बुधवारी जामखेडच्या राजकारणात भाजपने मोठा भूकंप घडवून आणला. राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पवनराजे राळेभात यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा चोंडी येथे पार पडला.
सविस्तर वृत्त लवकरच