Rahuri Advocate news  : आढाव दाम्पत्य हत्याकांड प्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची मोठी घोषणा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Rahuri Advocate news  : राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे राजाराम आढाव व मनिषा आढाव (Rajaram Adhav, Manisha Adhav) या पती पत्नीची खंडणीसाठी, अपहरण करून हत्या (Murder) करण्यात आल्याच्या घटनेने अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील वकिल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील वकिल संघटना (Ahmednagar Advocates Association) आक्रमक झाली आहे.याचे पडसाद जिल्हाभर उमटू लागले आहे. जिल्ह्यातील वकिल बांधवांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. राहुरीतील (Rahuri) घटनेविरोधात राज्यातील वकिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Rahuri Advocate news, Guardian Minister Radhakrishna Vikhe-Patil made big announcement in  case of Adhaav couple murder case,

राहुरीतील वकिल दाम्पत्याची हत्या प्रकरणाचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna vikhe Patil) यांनी आढाव यांच्या घरी आज सांत्वनपर भेट दिली. मानोरी (manori) येथे त्यांनी आढाव कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“यावेळी पालकमंत्री विखे म्हणाले की, वकिल आढाव दाम्पत्याची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. पोलिसांची कारवाई योग्य दिशेने चालू आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसवला जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. आढाव हत्याकांड खटला जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत पोलिसांना विशेष सुचना देण्यात आल्या आहेत, असे विखे यावेळी म्हणाले.”

“आढाव हत्याकांड गुन्ह्यातील पाचही आरोपींना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्या आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची माहिती दिली आहे. माफीचा साक्षीदार होण्याची देखील तयारी दर्शविली आहे. तपास यंत्रणा योग्य पद्धतीने काम करीत आहेत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईलच, असेही मंत्री विखे यांनी म्हटले. या हत्याकांडमध्ये एक आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीच्या दोन गंभीर गुन्ह्यात तो निर्दोष कसा सुटला याबाबत फेरचौकशी करण्याचा आदेश देण्यात आल्याचेही मंत्री विखे यांनी सांगितले.”

दरम्यान, राहुरीमध्ये आज वकिलांनी तहसीलवर मोर्चा नेत विविध मागण्या केल्या. यावेळी 3 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय जारी करण्यात आला. त्याचबरोबर साखळी उपोषणाचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व वकिल संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. राहुरी न्यायालयाच्या आवरातून वकिलांनी मोर्चा काढला. नगर जिल्हा वकील संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चाचे तहसील आवारात सभेत रूपांतर झाले. माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkat Tanpure) हे देखील मोर्चात सहभागी झाले होते.आरोपींची नार्कोटेस्ट व्हावी.प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, अशी वकिलांनी यावेळी मागणी केली. तहसीलदार पूनम दंडले यांना वकील संघटनांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

अहमदनगर जिल्हा बार असोसिएशननेही याबाबत एक निवेदन अहमदनगरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशांना दिले आहे. यात म्हटले आहे की, राहुरी येथील अॅडव्होकेट राजाराम आढाव व अॅडव्होकेट सौ. मनिषा आढाव यांची निघृण हत्या झाली, त्या बाबत निषेध सभा दिनांक २९/०१/२०२४ रोजी राहुरी येथील न्यायालयात झाली. सदर सभेस अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.

परिस्थितीचे गांभीर्य व शासनाने अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा या हेतुने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील कामकाजापासुन दिनांक ०३/०२/२०२४ पर्यंत सर्व वकीलांनी अलिप्त रहावे असा निर्णय घेणेत आला. त्यामुळे आजपासुन दिनांक ०३/०२/२०२४ पर्यंत न्यायालयातील कामकाजापसुन अहमदनगर बार असोसिएशनचे सदस्य वकील अलिप्त राहतील.