ब्रेकिंग न्यूज : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 3 उमेदवारांची घोषणा, पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ४८ तासांत मोठी लाॅटरी लागली आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने नांदेडला दोन उमेदवार्‍या जाहीर केल्या आहेत. मराठवाड्यातील भाजपच्या जेष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट झाला आहे. त्याचबरोबर केंद्रियमंत्री नारायण राणेंचाही पत्ता कट झाला आहे.

Breaking news, Ashok Chavan Medha Kulkarni Ajit Gopchde 3 candidates announced by BJP for Rajya Sabha election, Pankaja Munde is dropped again,

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक असतानाच भाजपने आज देशातील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 3 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजपचे नांदेडमधील प्रदेश उपाध्यक्ष अजित गोपछडे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. (Breaking news, Ashok Chavan Medha Kulkarni Ajit Gopchde 3 candidates announced by BJP for Rajya Sabha election, Pankaja Munde is dropped again,)

तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेने माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाही. उमेदवार निश्चित करताना तीन्ही पक्षात बैठकांचे सत्र सुरु आहे.