एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, फडणवीस शिंदे करणार सत्ता स्थापना दावा, नव्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरला

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजमा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार काल कोसळले होते.आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत दाखल त्यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आता नव्या सरकारचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भवनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट असे नवे सरकार आता राज्यात स्थापन होणार आहे. या नवीन सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे आज रात्री सात वाजता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे अशी माहिती समोर येत आहे.

शिवसेनेत बंडखोरी केल्यापासून गेल्या आठ दिवसांपासून मुंबईबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचं आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झालं. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मुंबई विमानतळावरून एकनाथ शिंदे थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर गेले. यावेळी शिंदे यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था देण्यात आली होती.

दरम्यान एकनाथ शिंदे मुंबई दाखल होण्याआधी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेत्यांनी शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपची बैठक झाली

त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भावनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे या दोघांचेही पेढा भरवून स्वागत केले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे शिष्टमंडळ दिसत आहे