MI officially out IPL 2021 | सहाव्या षटकांत सनरायझर्स हैदराबादने लावला निकाल : मुंबई इंडियन्स IPL स्पर्धेबाहेर !

विजेतेपदाची हॅटट्रिक साधण्याचे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगले

मुंबई  | MI officially out IPL 2021| मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूध्द सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) या सामन्याचा (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad match) निकाल काहीही लागणार असला तरी या IPL 2021 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचा संघ आता बाहेर फेकला गेला आहे. (MI officially out of the IPL 2021) विजेतेपदाची हॅटट्रिक साधण्याचे मुंबई इंडियन्सचे स्वप्न सामन्याच्या सहाव्या षटकात भंगले. आयपीएल 2021 च्या अंतिम चार संघात स्थान मिळवण्यासाठी एकमेव आशा असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने धावांचा डोंगर उभारूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही.(Sunrisers Hyderabad knocked out Mumbai Indians in the sixth over)

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने ९ बाद २३५ असा धावांचा विशाल डोंगर उभा केला, पण SRHनं केवळ ६४ धावा करून त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले. आज मुंबईनं ९ बाद २३५ धावा केल्यामुळे त्यांना सनरायझर्स हैदराबादला ६४ धावांवर गुंडाळावे लागणार होते, पण त्यांना तसे करता आले नाही. ६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेसन रॉयनं मारलेल्या चौकारानं गतविजेत्या मुंबई इंडियन्सला स्पर्धेतून बाहेर केले.

मुंबई इंडियन्सला हा सामना १७१+ धावांनी जिंकायचा होता, पण आता ते शक्य नाही. हैदराबादनं ६४ धावा पार करताच मुंबई इंडियन्सला बाहेर गेले. त्यामुळे १४ गुण व ०.५८७ नेट रन रेट असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सनं चौथ्या स्थानासह प्ले ऑफमधील स्थान पक्क केलं. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताच त्याचा टॉप टू मध्ये जाण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे आता RCBला एलिमिनेटरमध्ये KKR चा सामना करावा लागेल. दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स हे क्वालिफायर एकसाठी खेळतील.

 

web titel : MI officially out IPL 2021| Sunrisers Hyderabad knocked out Mumbai Indians in the sixth over