pune crime news | 97 लाखांची रोकड चोरल्याप्रकरणी कर्जत -जामखेडमधील दोघा तरूणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई  : 60 लाखाची रोकड हस्तगत

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  pune crime news | सुकामेवा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची पुण्यातून (Pune Crime) 97 लाखाची रोकड (stealing rs 97 lakh) कारसह घेऊन परागंदा झालेल्या कर्जत – जामखेड मधील दोघा तरूणांनी बेड्या (arrest) ठोकण्याची धडाकेबाज कारवाई कर्जत (karjat police) व पुणे पोलिसांनी (Pune police)  संयुक्त पणे पार पाडली. या कारवाईत आरोपींकडून तब्बल 60 लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. कर्जत पोलिसांच्या कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे. (pune crime news | Two youths thieves from Karjat Jamkhed were arrested the pune police and nagar karjat police for stealing Rs 97 lakh in cash)

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील सुकामेवा (ड्रायफुट) विक्रीचा व्यवसाय करणाऱे 50 वर्षीय व्यापारी लघुशंका करण्यासाठी थांबले असता त्यांच्या कारमध्ये ठेवलेली 97 लाखांची रोकड कारसह चोरून नेल्याची घटना दि 05 रोजी पुण्यात (Pune Crime) घडली होती.

पुण्यात (Pune Crime) घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना पुणे पोलीस आणि कर्जत पोलिसांनी (nagar police) बेड्या (arrest) ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विजय महादेव हुलगुंडे  (वय-25 रा. काटेवाडी, जामखेड, अहमदनगर), नाना रामचंद्र माने (वय-25 रा. मलठण, कर्जत, अहमदनगर ) या दोघा तरूणांचा समावेश आहे.

97 लाखांची रोकड कारसह चोरून नेल्याप्रकरणी 50 वर्षीय व्यापाऱ्यांने गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना
पकडण्यासाठी पुणे पोलीस (Pune Police) आणि कर्जत पोलिसांनी (Karjat Police) संयुक्त कारवाई हाती घेतली होती. अत्यंत वेगाने या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सुकामेवा विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी ते दिवसभर मालाची विक्री करुन जमा झालेली रक्कम घेऊन घरी निघाले होते. फिर्यादी हे लघुशंका करण्यासाठी उतरल्यानंतर कारमध्ये ठेवलेली 97 लाखाची रोकड कारसह चालकाने पळवून नेली.याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर अहमदनगर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. आरोपी कर्जत व जामखेड तालुक्यातील असल्याचे तपासात समोर आले होते.

अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी तातडीने आरोपींना शोधण्याचे आदेश कर्जत पोलिसांना दिले होते.तर दुसरीकडे येरवडा पोलीस (Yerawada Police) आणि गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस (Crime Branch Unit 5 Police) सदर आरोपींचा वेगाने शोध घेत होते.

कर्जत पोलीस तपास करत असताना संबंधित आरोपी पुरंदरमधील विर येथे असल्याची माहिती मिळाली. आरोपी कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) परिसरातील असल्याने त्यांची गुन्ह्याची पद्धतीची माहिती असल्याने कर्जत पोलिसांनी तात्काळ हालचाल केली.

आरोपींचा ठावठिकाणा माहित होताच कर्जत पोलिस व  क्राईम युनिट पाचच्या पोलिसांनी वीर येथील शाळेजवळ धाड टाकली. शाळेजवळ लपून बसलेल्या आरोपींपैकी नाना माने (Nana Ramchandra Mane) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले पण विजय हुलगुंडे पळून जाण्यात यशस्वी झाला.

कर्जत पोलिसांच्या पथकाने विजय हुलगुंडे (Vijay Mahadev Hulgunde) याचा पाठलाग करून ताब्यात घेतले.आरोपींना कर्जत पोलीस ठाण्यात आणून येरवडा पोलीस स्टेशनचे (Yerawada Police Station) तपासी अधिकारी (Investigating Officer) रविंद्र आळेकर (Police Inspector Ravindra Alekar) आणि क्राईम युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare) यांच्या ताब्यात (Pune Crime) देण्यात आले.

कर्जत आणि पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, प्रसाद लोणारे यांनी आरोपींकडून 60 लाख रुपये जप्त केले. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

दरम्यान या धडाकेबाज कारवाईच्या पथकात कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम तसेच पुणे पोलिस पथकातील पोलीस निरीक्षक युनूस शेख, हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, रवींद्र आळेकर, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, अश्रूबा मोराळे, अमजद शेख, कैलास डुकरे, चेतन चव्हाण, गणेश वाघ सह आदींचा सहभाग होता.

Web Title : pune crime news | Two youths thieves from Karjat Jamkhed were arrested the pune police and nagar karjat police for stealing Rs 97 lakh in cash