bjp news | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins series of CM changes | कर्नाटक, उत्तराखंड आणि आता गुजरात, भाजपची मुख्यमंत्री बदलाची मालिका सुरू |

bjp news | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins series of CM changes | अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.राज्यपालांना भेटल्यानंतर रुपाणी यांनी स्वतः राजीनामा देत असल्याची घोषणा केली.उत्तराखंड, कर्नाटकनंतर आता गुजरातमध्येही मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकांना (Gujarat Assembly elections) अवघे एक वर्ष उरले असताना रुपाणी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाचे सत्र सुरु आहे. हा निवडणूक गेम असल्याचे बोलले जात आहे. (Gujarat Chief Minister Vijay Rupani has resigned)

भाजपने आतापर्यंत कर्नाटक, उत्तराखंड आणि गुजरातमधील मुख्यमंत्री बदलले आहेत. कर्नाटक वगळता इतर दोन राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यातही उत्तराखंडची परिस्थिती वेगळी होती. उत्तराखंडमध्ये तीरथ सिंह रावत हे मुख्यमंत्री होते.ते निवडून आलेले नव्हते. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत निवडून होणं अपेक्षित होतं. उत्तराखंडमध्ये विधान परिषद नसल्याने त्यांना विधान परिषदेतून निवडून आणणं शक्य नव्हतं. दुसरीकडे भाजपमधील एकही आमदार राजीनामा देऊन त्यांच्यासाठी जागा रिक्त करायला तयार नव्हता. त्यामुळे रावत यांची कोंडी झाली होती. परिणामी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. (Election Game on | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins series of CM changes)

कर्नाटकमध्ये येडियुरप्पांवर पक्षश्रेष्ठी नाराज होते. त्यांच्यावर अनेक आरोपही झाले होते. त्यामुळे राज्यातील पक्षाची प्रतिमा मलिन झाली होती. त्यातून पक्षाला बाहेर काढण्यासाठी येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली. गुजरातमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. गुजरातमधील पटेल समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे पटेल समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने व्यूवहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला असून त्यांच्या जागी पटेल समाजातून मुख्यमंत्री देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.(bjp news | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins series of CM changes)

नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष अधिकाधिक बळकट करण्याचं भाजपमध्ये घाटत असल्यानेच भाजपने मुख्यमंत्री बदलाचा सपाटा लावला असल्याचं बोललं जात आहे ( bjp news | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins series of CM changes)

तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा (Tirath Singh Rawat resigns)

या आधी 2 जुलै रोजी तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना रावत यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात त्यांनी राजीनाम्याचं कारण सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांना 6 महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं अपेक्षित आहे. मात्र, कलम 151 प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास केवळ 1 वर्षाचा कालावधी शिल्लक असेल तर पोटनिवडणूक घेता येत नाही. त्यामुळे राज्यात संवैधानिक संकट तयार होऊ नये म्हणून मी राजीनामा देऊ इच्छित आहे, असं रावत यांनी म्हटलं होतं.( bjp news | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins a series of CM changes)

येडियुरप्पा यांचा राजीनामा (Yeddyurappa’s resignation)

बीएस येडियुरप्पा यांनी 26 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु (Bangalore) हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे, अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या होत्या. (bjp news | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins series of CM changes)

रुपाणींचा राजीनामा (Rupani has resigned)

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (Prime Minister Narendra Modi, Union Home Minister Amit Shah and BJP national president JP Nadda) यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले.

रुपाणी यांनी आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्याबाबत कुणीही दुजोरा दिला नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही. गुजरातमधील पटेल समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे पटेल समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने व्यूवहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला असून त्यांच्या जागी पटेल समाजातून मुख्यमंत्री देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.(bjp news | Karnataka | Uttarakhand | Gujarat| BJP begins a series of CM changes )

राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी साधला पत्रकारांशी संवाद (After resigning, Rupani spoke to reporters)

‘गुजरातसाठी मला जी काही संधी मिळाली त्यासाठी मी माननीय पंतप्रधानांचा आभारी आहे. आता हा प्रवास नव्या नेतृत्वाखाली पुढे गेला पाहिजे. हे लक्षात घेऊन मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्याची जबाबदारी काळानुसार बदलत राहणे ही भाजपची परंपरा आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ती कार्यकर्ते पूर्ण समर्पणाने पार पाडतात. यावेळी त्यांनी पक्षातील जबाबदाऱ्या बदलणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे म्हंटले. तसेच ५ वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याबाबत पक्षाचे आभार देखील मानले. (bjp news | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins series of CM changes)

‘भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (‘BJP president J. P. Nadda) यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. यापुढे माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती मी पार पाडेन. आम्ही ‘पद’ नाही ‘जबाबदारी’ म्हणतो. मला जी जबाबदारी देण्यात आली होती ती मी पार पाडली. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) नेतृत्वाखाली निवडणुका लढतो आणि २०२२च्या निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील.’ असं रुपाणी म्हणाले.( bjp news | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins series of CM changes)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘होम ग्राउंड’ असलेल्या गुजरातेत २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी रुपाणी यांनी दिलेला राजीनामा अनपेक्षित मानला जातोय. रुपाणी यांच्या पाठोपाठ त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने देखील राजीनामा दिला आहे.

या घटनाक्रमानंतर गुजरातमध्ये भाजपपुढे आता तीन मार्ग उरले आहेत. पहिला मार्ग म्हणजे भाजपला राज्यात रुपाणी यांच्या जागी नवा चेहरा आणावा लागेल व नवे मंत्रिमंडळ स्थापन करावे लागेल. दुसरा पर्याय राज्यात राष्ट्रपती राजवट (Presidential reign) लागू करावी लागेल व तिसरा पर्याय राज्यात मुदतपूर्व निवडणुका घ्यावा लागतील.(bjp news | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins series of CM changes)

भाजप पहिला मार्ग निवडण्याची शक्यता अधिक असून रुपाणी यांच्या जागी नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya ) त्यांची जागा घेतील अशी शक्यता आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Deputy Chief Minister Nitin Patel) यांचे नाव देखील असेल.( bjp news | Karnataka Uttarakhand Gujarat BJP begins series of CM changes)