मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, चंद्रकांत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अक्षरशः मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अस मोठं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत पाटील बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो, कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने भाजप आणि शिंदे गटात काही आलबेल नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.

खोटं असेल तर, अनिल परबांचा फोन तपासून पहा, आदित्य ठाकरे विरुद्ध शिंदे गट आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला

दरम्यान, राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अस मानलं जातं होत मात्र भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर आता काही दिवस उलटत नाही तोच चंद्रकांत पाटील यांच्या या खळबळजनक विधानांनंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते किंवा युतीवर काय परिणाम होतो हे सुद्धा पहायला हवं.

महाराष्ट्र भाजपने तो व्हिडिओ हटवला

दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या भाषणाचे व्हिडिओ भाजपने सर्व सोशल मीडिया साईट वरून हटवले आहेत सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील यांच्या भाषणावर वेगवेगळ्या कमेंट येऊ लागल्या होत्या, राजकीय वर्तुवाद चर्चा सुरू झाल्या होत्या त्यामुळे भाजपने पाटील यांच्या भाषणाचा तो व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून हटवला आहे.