IND vs NZ 1st Test LIVE Scorecard : बंगलोर कसोटीत भारतीय संघ 46 धावांत ऑल आउट, न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज matt Henry व William O Rourke ठरले बंगलोर कसोटीच्या पहिल्या दिवसाचे हिरो !
IND vs NZ 1st Test LIVE Scorecard : भारत दौर्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाने, बेंगलोर येथे खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर रोखला. भारताचे प्रमुख आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. बंगलोर कसोटीवर न्यूझीलंड संघाने मजबुत पकड मिळवली. मॅट हेन्री matt Henry व William O Rourke हे दोघे गोलंदाज बंगलोर कसोटीच्या पहिल्या दिवसाचे हिरो ठरले.
बंगलोर कसोटीत सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता.आज दुसर्या पावसाने विश्रांती घेतली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. बंगलोर कसोटीच्या दुसर्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. भारताचा पहिला डाव डाव अवघ्या 46 धावांवर अटोपला. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भेदक बॉलिंग करत पहिल्या कसोटीवर मजबुत पकड मिळवली.
बंगलोर कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पहिल्याच डावात ढेपाळली. भारताचे स्टार खेळाडू पुर्णता: अपयशी ठरले.कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. रोहित शर्मा टीम साऊथीच्या गोलंदाजीवर अवघ्या २ धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि सरफराज खान लोकेश राहूल हे शून्यावर बाद झाले. तर आक्रमक सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल हा १३ धावांवर बाद झाला.
रविंद्र जडेजा आणि आर आश्विन हेही शून्यावर बाद झाले. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा २० धावांवर बाद झाला. जसप्रित बुमराह शून्यावर बाद झाला. मैदानावर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दोघे फलंदाजी करत आहेत. तेही स्वस्तात बाद झाले. कुलदीप यादवच्या रूपाने भारताची शेवटची विकेट्स मॅट हेन्री (matt Henry) याने घेतली. कुलदीप यादव २ धावांवर बाद झाला. तर मोहम्मद सिराज ४ धावांवर नाबाद राहिला.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बंगलोर कसोटीच्या पहिल्या डावात भेदक गोलंदाजी केली. मॅट हेन्री (matt Henry) याने भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या तर will OʻRourke (William O Rourke) यानेही खतरनाक बॉलिंग करत ४ विकेट्स मिळवल्या. टीम साऊथीला अवघी १ विकेट्स मिळाली. भारताकडून ऋषभ पंत यांने सर्वाधिक २० धावा केल्या. भारताचा पहिला डाव अवघ्या ३१.२ ओव्हर्समध्ये अटोपला.