IND vs ENG 1st T20 Match Result : पहिल्या टी 20 सामन्यात भारताने इग्लंडला चारली पराभवाची धुळ, अभिषेक शर्माची वादळी अर्धशतकीय खेळी !

IND vs ENG 1st T20 Match Result : भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला टी 20 सामना जिंकला. अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला सहजपणे विजय मिळवून दिला. भारताने 133 धावांचे अव्हान ३ गडी गमावून पुर्ण केले. भारताने हा सामना 7 गडी राखून जिंकला. भारताने 133 धावांचे अव्हान अवघ्या 12.5 षटकांत पुर्ण केले. पहिल्या टी 20 सामन्यात वरूण चक्रवर्तीची (Varun Chakraborty) भेदक गोलंदाजी, नितीशकुमार रेड्डी व रिंकू सिंगचे (nitishkumar reddy, RinkuSingh) अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि अभिषेक शर्माची विस्फोटक फलंदाजी याने गाजली. अभिषेक शर्मा हा आजच्या पहिल्या सामन्याचा खरा हिरो ठरला.

Abhishek Sharma's storming half-century, India thrashed England in the first T20, ind vs eng 1st t20 match result, India beat England in the first T20 match,

इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताच्या दौर्‍यावर आला आहे. भारत विरुद्ध  इंग्लंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी 20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या इडन गार्डनवर आज २२ जानेवारी रोजी पार पडला. नाणेफेकीचा कौल भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवने जिंकला. भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार सुर्यकुमार यादवने घेतलेला फलंदाजीचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारताने इंग्लंडला अवघ्या १३२ धावांवर रोखले.

भारतीय क्रिकेट संघ विरूध्द इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील टी 20 मालिकेला आजपासून प्रारंभ झाला. जोस बटलर याच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला आहे. इडन गार्डनवर खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडची सुरुवात खराब झाली. अर्शदिप सिंगने त्यांचे दोन्ही सलामीवीर झटपट माघारी धाडले. त्यानंतर 8 व्या षटकांत गोलंदाजीस आलेल्या वरूण चक्रवर्तीने आपल्या एकाच षटकांत हॅरी ब्रुक व लायम लिविंगस्टोन या दोघांना माघारी धाडले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याचे एकाकी किल्ला लढवत 68 धावा केल्या. परंतू तो शेवटपर्यंत मैदानात थांबणार असे वाटत असतानाच वरूण चक्रवर्तीने त्याला बाद केले. वरूणने 4 षटकांत 23 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडचे 3 महत्वाचे फलंदाज बाद केले.

इंग्लंडच्या संघांकडून कर्णधार जोस बटलरचं अर्धशतकाशिवाय फक्त हॅरी ब्रूक 17 आणि जोप्रा आर्चर यांना 12 दुहेरी आकडा गाठता आला. इंग्लंडचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. परिणामी पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा डाव निर्धारित २० षटकात सर्व बाद १३२ धावांवर आटोपला. भारताकडून वरूण चक्रवर्ती 3, हर्शदीप सिंग 2,  हार्दिक पांड्या 2,  अक्षर पटेल 2 हे चार गोलंदाज यशस्वी ठरले. भारताने फलंदाजी करताना अनेक अप्रतिम कॅच घेतले. नितीशकुमार रेड्डी व रिंकू सिंग यांनी अप्रतिम कॅच घेत सामन्याचे पारडे फिरवून टाकले.

IND vs ENG 1st T20 Match Result : अभिषेक शर्माच्या वादळापुढे इंग्लंडचा संघ नेस्तनाबूत

दरम्यान, 133 धावांचे लक्ष्य घेऊन भारताकडून संजु सॅमसन व अभिषेक शर्मा हे दोघे सलामीला मैदानात उतरले होते. दोघांनी आक्रमक सुरुवात केली होती. संजु सॅमसन 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादव हा शून्यावर बाद झाला. यामुळे भारतीय संघ संकटात सापडतो की काय असे वाटत असतानाच डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा याने सामन्याचे सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. त्याने वादळी खेळी केली. तो इंग्लंडच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला होता. त्यांने अवघ्या 20 चेंडूमध्ये आपले अर्धशतक झळकावले.

अर्धशतक झळकल्या नंतरही त्याने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच फोडून काढले. संघाला विजयासाठी 8 धावा बाकी असताना तो मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. त्याने 34 चेंडूत 79 धावा केल्या. 79 धावांच्या खेळीत त्याने 8 षटकार आणि 5 चौकार मारले. अभिषेक शर्माच्या वादळापुढे इंग्लंडचा संघ नेस्तनाबूत झाला.  भारताकडून याने नाबाद 19 तर हार्दिक पांड्या याने नाबाद 3 धावा केल्या. भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना सात विकेट्सने जिंकला. टी 20 मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा टी 20 सामना चेन्नई येथे 25 जानेवारीला होणार आहे.