Boxing Day Test ind vs aus 4th Test Highlights day 2 : बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा पहिला डाव गडगडला, विराट कोहलीमुळे यशस्वी जयस्वाल रन आउट झाला आणि त्याचे शतक हुकले !
Boxing Day Test ind vs aus 4th Test Highlights day 2 : बाॅक्सिंग डे कसोटीत (fourth test) ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या पहिल्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा व के.एल राहूल (Rohit Sharma, K L Rahul) मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. भारताचा युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडपून काढले. तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच विराट कोहलीच्या ( Virat Kohali )आणि त्याच्यात धाव घेताना गोंधळ झाला आणि तो ८२ धावांवर रन आउट झाला. (Yashasvi jaiswal run out today) त्याने अर्धशतक झळकावताना अनेक दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी केली. दुसर्या दिवसअखेर भारताची अवस्था ५ बाद १६४ अशी झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने दुसर्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली असता त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी जोरदार बॅटिंग केली. ॲलेक्स केरी ( ३१), कर्णधार पॅट कमिन्स ( ४९) यांनी चांगले योगदान दिले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४७४ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आले. जसप्रीत बुमराहने ४, रवींद्र जडेजाने ३ व आकाश दीपने २ विकेट्स घेतल्या.
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी १९ वर्षीय सॅम कॉन्स्टासने पदार्पणातच भारतीय गोलंदाजांना दमवले. जसप्रीत बुमराहसारख्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजाला त्याने मारलेले रिव्हर्स शॉट्स अविश्वसनीय होते. त्याला पाहून उस्मान ख्वाजाही ( ५७) पेटला आणि त्याने अर्धशतक झळकावले. कॉन्स्टास ६५ चेंडूंत ६० धावांवर माघारी परतल्यानंतर मार्नस लाबुशेन ( ७२) व स्टीव्ह स्मिथ यांनी जोरदार फटकेबाजी केली. स्मिथने १९७ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह १४० धावा केल्या.ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा उभ्या केल्या.
प्रत्युत्तरास आलेल्या, भारताला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. दोन सामन्यानंतर सलामीला आलेला रोहित शर्मा ( ३) त्याचा फेव्हरिट पुल शॉट मारण्याच्या नादात बाद झाला. कमिन्सला विकेट देऊन तो माघारी परतला. कमिन्सच्या अप्रतिम इन स्विंग चेंडूने लोकेश राहुलचा ( २४) त्रिफळा उडवला.यशस्वी जैस्वाल व विराट कोहली मैदानावर उभे राहिले आणि दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
विराटचा आवडता कव्हर ड्राईव्ह शॉटने चाहत्यांना आनंदीत केले. यशस्वीने अर्धशतक पूर्ण करताना अनेक दिग्गजांशी बरोबरी केली आहे. तो ११७ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारांसह ८२ धावांवर बाद झाला. अतिघाई यशस्वीला महागात पडली आणि तो दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. पाठोपाठ विराटही ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर नाईट वाॅचमन म्हणून मैदानावर आलेला अकाश दीप शून्यावर बाद झाला. भारताची अवस्था ५ बाद १६४ अशी झाली आहे. मैदानावर ऋषभ पंत ६ तर रविंद्र जडेजा ४ धावांवर नाबाद आहेत.
२३ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कसोटीत सर्वाधिक ५०+ धावांची खेळी करणारे भारतीय
• २९ – सचिन तेंडुलकर
• १५ – दिलीप वेंगसरकर
• १३ – यशस्वी जैस्वाल, रवी शास्त्री, कपिल देव
कॅलेंडर वर्षात कसोटीत सर्वाधिक ५०+ धावा करणारे भारतीय
• १३ – वीरेंद्र सेहवाग, २०१०
• १२ – सचिन तेंडुलकर, २०१०
• १२ -सुनील गावस्कर, १९७९
• ११ – यशस्वी जैस्वाल, २०२४
• ११ – गुंडप्पा विश्वनाथ, १९७९
• ११ – मोहिंदर अमरनाथ, १९८३