Diwali 2022 Bonus And Gift News | नादच खुळा… दिवाळीनिमित्त मालकाने कर्मचाऱ्यांना भेट दिल्या कार आणि बाईक !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Diwali 2022 Bonus And Gift News : प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त बोनस (Diwali Bonus) जाहीर केला जातो. पण खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांच्या मालकाच्या मूडवर अवलंबून असते. मात्र देशात असे काही उद्योगपती आहेत, जे प्रत्येक दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना एकापेक्षा जास्त भेटवस्तू भेेट देतात. अलिकडच्या काही वर्षांत हे घडत आहे. भारतातील काही कंपन्यांचे मालक अतिशय दिलदार आहेेत. याचेच आणखीन एक उदाहरण आता समोर आले आहे.

Diwali 2022 Bonuses and Gifts News, Owner of Jayanti jewelery store in Chennai gifts cars and bikes to employees on Diwali, Jayanti Lal Chalani,Diamond merchant Savji Dholakia news,

चैन्नईतील जयंती ज्वेलरी स्टोअरकडून आपल्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट म्हणून थेट कार आणि बाईक देण्यात आल्या आहेत. कंपनीचे मालक जयंती लाल चालानी यांनी आपल्या कंपनीतील 10 कर्मचाऱ्यांना कार आणि 20 कर्मचाऱ्यांना बाईक भेट दिल्या आहेत.चलनी ज्वेलर्सचे मालक जयंती लाल म्हणाले की, या कर्मचाऱ्यांनी चढ-उताराच्या काळातही आम्हाला साथ दिली आहे. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही भेट आहे. यापूर्वी 8 कार आणि 18 बाईक भेट दिल्या होत्या.

Diwali 2022 Bonuses and Gifts News, Owner of Jayanti jewelery store in Chennai gifts cars and bikes to employees on Diwali, Jayanti Lal Chalani,Diamond merchant Savji Dholakia news,

यंदा दिवाळी बोनस बाबत कंपनीकडून अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना काहीही सांगण्यात आले नव्हते. कर्मचाऱ्यांना कंपनीकडूून अचानक अनोखे सरप्राईज मिळताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी कंपनीने विमा संरक्षण आणि पाच वर्षांच्या गॅरंटीसह स्वयंचलित कारचे वितरण केले. कार भेट मिळताच कर्मचारी आनंदून गेले होते.

Diwali 2022 Bonuses and Gifts News, Owner of Jayanti jewelery store in Chennai gifts cars and bikes to employees on Diwali, Jayanti Lal Chalani,Diamond merchant Savji Dholakia news,

चेन्नईचे जयंती लाल चालानी असोत किंवा सुरतचे सावजी ढोलकिया असोत, दिवाळीला कर्मचाऱ्यांना बोनस आणि अनमोल भेटवस्तू देण्याच्या बाबतीत यांचा हात कोणीच धरू शकतं नाही असेच म्हणावे लागेल.

Diwali 2022 Bonuses and Gifts News, Owner of Jayanti jewelery store in Chennai gifts cars and bikes to employees on Diwali, Jayanti Lal Chalani,Diamond merchant Savji Dholakia news,

सावजी ढोलकियांचा दिलदारपणा नेहमी देशात चर्चेत

गुजरातचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया दरवर्षी दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देतात. 2014 मध्ये त्यांनी 491 कार आणि 207 फ्लॅट्स दिवाळी बोनस म्हणून दिले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी दिवाळीला 400 फ्लॅट आणि 1260 कार गिफ्ट केल्या होत्या. 2018 मध्ये त्यांनी आपल्या तीन कर्मचाऱ्यांना महागडी मर्सिडीज-बेंझ कार भेट दिली होती. हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्या दिलदारपणाचे देशात नेहमी कौतूक होते.

5 कर्मचाऱ्यांना BMW कार भेट

चेन्नईस्थित कंपनी किसफ्लोने (Kissflow) 2022 च्या एप्रिलमध्ये आपल्या 5 कर्मचाऱ्यांना BMW सारखी लक्झरी कार भेट दिली होती. या सर्वांना 80 लाख रुपये किंमतीची BMW 530d देण्यात आली होती. कंपनीचे सीईओ सुरेश संबदम यांनी तेव्हा सांगितले होते की, हे पाच कर्मचारी सुख-दु:खात कंपनीसोबत राहिले. फेब्रुवारीमध्ये केरळमधील एका व्यावसायिकानेही आपल्या कर्मचाऱ्याला मर्सिडीज बेंझ भेट दिली होती.

100 कर्मचाऱ्यांना 100 कार भेट

चेन्नईस्थित आयटी फर्म Ideas2IT ने आपल्या 100 कर्मचाऱ्यांना 100 कार भेट दिल्या आहेत. लॉयल्टी प्रोग्राम अंतर्गत त्यांना या भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. तसेच काही कर्मचाऱ्यांना सोन्याची नाणी आणि आयफोनही भेेट देण्यात आले. Ideas2IT ने आपल्या कर्मचार्‍यांना मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno), इग्निस (Ignis), स्विफ्ट (Swift) सियाझ (Ciaz), एर्टिगा (Ertiga), XL6 आणि विटारा ब्रेझा (Vitara Brezza) सारख्या कार भेट दिल्या होत्या.

सौरऊर्जेवर चालणारे दुधाळा गाव

गुजरातमधील आणखी एक हिरे व्यापारी गोविंद ढोलकिया आहेत. ते श्री राम कृष्णा एक्सपोर्ट हीरा कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कुटुंबाने अमरेली जिल्ह्यातील दुधाळा या त्यांच्या मूळ गावी प्रत्येक छतावर सौर पॅनेल बसवले आहेत. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे दुधाळा हे देशातील पहिले गाव आहे. संपूर्ण गावात 232 घरे, दुकाने आणि इतर आस्थापनांमध्ये एकूण 276.5 किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत. गावात वर्षभरापासून जी घरे बंद आहेत अश्या घरांमध्ये सोलर पॅनल बसवण्यात आलेले नाहीत.