दीड लाखाची लाच स्विकारताना मंडल अधिकाऱ्यासह तलाठी अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । दीड लाखाची लाच स्विकारताना सर्कलसह तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्याची धडक कारवाई पार पाडली आहे. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

While accepting a bribe of one and a half lakh, Talathi along with the mandal officer got caught in the net of bribery department, Incident at Amalner

अंमळनेर शहरात बिल्डिंग मटेरियल स्पलायचा व्यवसाय करणाऱ्या एका 30 वर्षीय व्यावसायिकाकडे सदर व्यवसायासाठी स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.MH18 AA 1153 हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अंमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते.

पकडलेल्या डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 1,50,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची 1,50,000/-रुपये रक्कम तलाठी कार्यालय अमळनेर येथे पंचांसमक्ष तलाठी आणि मंडळाधिकारी स्वीकारली.

या प्रकरणी गणेश राजाराम महाजन,वय-४६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी, अमळनेर शहर. रा.नविन बस स्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव जि.जळगाव वर्ग-३ आणि दिनेश आनंद सोनवणे, वय-४८ वर्षे, व्यवसाय-नोकरी, मंडळ अधिकारी,अमळनेर रा.फरशी रोड,अमळनेर. ता.अमळनेर जि.जळगाव. वर्ग-3 या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने 13 रोजी केली.

कारवाईच्या पथकात लाच लुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील,सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हेेड काँस्टेबल अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे,शैला धनगर, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनिल वानखेडे, ईश्वर धनगर, पोलिस काँस्टेबल महेश सोमवंशी, प्रदिप पोळ,राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी सह आदींचा समावेश होता.