ब्रेकिंग : जामखेड तालुक्यातील ठेकेदाराकडून 40 हजार रूपयांची लाच स्विकारताना महिला सरपंच अडकली लाचलुचपतच्या जाळ्यात, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचे बील अकाउंटला जमा करण्यासाठी ठेकेदाराकडून 40 हजार रूपयांची लाच स्विकारताना श्रीगोंदा तालुक्यातील एका महिला सरपंचाला रंगेहाथ पकडण्याची धडक कारवाई अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी पार पाडली. जामखेड तालुक्यातील एका ठेकेदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

While accepting bribe of 40 thousand rupees from a contractor in Jamkhed taluka, woman sarpanch got caught in  net of bribery, there was stir in political circle,

याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील एका 33 वर्षीय शासकीय ठेकेदाराने श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती, संरक्षण भिंत बांधकाम अशा कामाचा 4 लाख 61 हजार 568 रूपयांचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. तक्रारदार यांनी मुदतीत सर्व काम पूर्ण केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे कामाचे बिल अकाउंटला जमा करणे बाबत सरपंच मॅडम व त्यांचे पती यांना विनंती केली असता त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46 हजार रूपये लाचेची मागणी ठेकेदाराकडे केली होती. अशी तक्रार जामखेड तालुक्यातील एका 33 वर्षीय ठेकेदाराने अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 10 ऑक्टोबर 2023 रोजी केली होती.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगरच्या पथकाने सदर तक्रारीची लाच पडताळणी केली असता कोकणगावच्या सरपंच उज्वला सतिष रजपूत, वय 32 वर्ष तसेच त्यांचे पती सतिष बबन रजपूत, वय 42 वर्ष या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे 46 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच सदर लाच रक्कम  स्वीकारण्याचे मान्य केले होते.बिल जमा झाल्यानंतर आज 23 नोव्हेंबर 2023 रोजी सरपंच उज्वला सतिष रजपूत यांनी तक्रारदार ठेकेदारास लाच रक्कम घेऊन बोलविले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगरच्या पथकाने कोकणगाव ग्रामपंचायत सापळा लावला होता. या सापळा कारवाई सरपंच उज्वला सतिष रजपूत यांना 40 हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्याची कारवाई करण्यात आली. श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची काम सुरू आहे.

ही कारवाई पोलिस उप अधीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोलिस नाईक रमेश चौधरी, पोकॉ बाबासाहेब कराड, सचिन सुदृक, रवी निमसे, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, राधा खेमनर चालक दशरथ लाड यांचा समावेश होता.

▶️ युनिट – अहमदनगर
▶️ तक्रारदार- पुरुष  वय- 33,रा  जवळा, ता- जामखेड, जि.अहमदनगर
▶️ आरोपी – १) उज्वला सतिष रजपूत, वय 32 वर्ष, सरपंच, कोकणगाव, ता- श्रीगोंदा, जि. अहमदनगर
२)  सतिष बबन रजपूत, वय 42 वर्ष ,धंदा:शेती, रा. कोकणगाव, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर

▶️ लाचेची मागणी- एकूण बिल 4,61,568 रुपये रकमेच्या 10 टक्के/-₹ 46,000/-₹ तडजोडी अंती 40,000/-₹

▶️ लाचेची मागणी – ता.10/07/2023
▶️ लाच स्विकारली – 40,000/- ₹
▶️ लाच स्विकारली दिनांक  23/11/2023

▶️ लाचेचे कारण -तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असुन, त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती,संरक्षण भिंत बांधकाम अशा कामाचा 4,61568/-₹ चा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता,तक्रारदार यांनी मुदतीत सर्व काम पूर्ण केले,त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे कामाचे बिल अकाउंट ला जमा करणे बाबत सरपंच मॅडम व त्यांचे पती यांना विनंती केली असता त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46,000/-₹   ची लाच मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे दिनांक 10/07/2023 रोजी दिली. सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक 10/07/2023 रोजी कोकणगाव ग्रामपंचायत येथे लाच मागणी पडताळणी केली  असता यातील लोकसेवक सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी तक्रारदार यांचे कडे 46000/-₹ लाच मागणी करुन सदर लाच  रक्कम  स्वीकारण्याचे मान्य केले,बिल जमा झाल्यानंतर आज रोजी आलोसे क्र 1 यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेऊन  बोलविले असता कोकणगाव ग्रामपंचायत येथे आज रोजी सापळा लावण्यात आला,सदर सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक क्रमांक 1 यांनी आज रोजी ग्राम पंचायत कोकणगाव येथे सदर लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ सापळा अधिकारी :- शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर

▶️  पर्यवेक्षण अधिकारी : प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर

▶️ सापळा पथक : पोना/ रमेश चौधरी, पोकॉ/बाबासाहेब कराड,सचिन सुदृक,रवी निमसे, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के,राधा खेमनर चालक दशरथ लाड

▶ मार्गदर्शक : मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶मा. श्री. माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र,नाशिक

▶️ श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक

▶ आरोपीचे सक्षम अधिकारी : मा. विभागीय आयुक्त, नाशिक.
——-•••••••••••••••••••••••—–
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
@ टोल फ्रि क्रं. १०६४