जामखेड दौर्‍यात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केली मोठी घोषणा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । भटक्या समूहातील लोकांना लोकशाहीच्या प्रक्रियेत आणण्यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून मोठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. भटक्या समुहाच्या मतदार नोंदणी संदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जामखेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे.

Voter registration process will be simplified so that nomads can enter the democratic process - Chief Electoral Officer Shrikant Deshpande

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे आज 16 सप्टेंबर 2022 रोजी जामखेड दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदारकार्ड आधारकार्डशी संलग्न करण्याच्या मोहिमेचा आढावा घेतला. कर्जत-जामखेड मतदारसंघात सुरु असलेल्या वेगवान कामाचे यावेळी त्यांनी कौतुक केले. ज्या बीएलओंनी (BLO) मतदानकार्ड आधार कार्डशी शंभर टक्के लिंक केले त्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आला.यावेळी प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे, तहसीलदार नानासाहेब आगळे, निवडणूक नायब तहसीलदार मनोज भोसेकर, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ सह आदी उपस्थित होते.

Voter registration process will be simplified so that nomads can enter the democratic process - Chief Electoral Officer Shrikant Deshpande

निवडणूक आयोगाकडून राज्यव्यापी संवाद कार्यक्रम

यावेळी पुढे बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले की,लोकशाही सर्वसमावेशक करायची असेल तर वंचित घटकांना मतदान प्रक्रियेत मतदार म्हणून सामील करणं गरजेचं आहे.वंचित घटकांचा मतदार प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राज्यव्यापी संवाद कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यातून वंचित घटकांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यात येत आहे. तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी काय करता येईल यावरही मंथन केले जात आहे. तसेच मतदान नोंदणीचे महत्व पटवून देण्याबरोबरच मतदान प्रक्रियेत दारू, पैसा यासारख्या अमिषांना बळी न पडता तुमचे मत विकू नका याबाबत जनजागृती केली जात असल्याचे ते म्हणाले.

भटक्या समुहांच्या मतदार नोंदणीबाबत मोठी घोषणा

यावेळी बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले की, भटक्या समूहातील लोकांकडे रहिवासाचा पुरावा नसतो तसेच जन्म तारखेचाही पुरावा नसतो, त्यामुळे त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट होत नाही. परंतू आता या घटकांना मतदानाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी त्या घटकातील नागरिकांनी स्व-प्रतिज्ञापत्र किंवा ते ज्या गावात राहतात त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी किंवा पोलिस पाटलाचा दाखला दिला तर, तो पुरावा ग्राह्य मानून त्यांची मतदार नोंदणी करता येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी बोलताना केली.

Voter registration process will be simplified so that nomads can enter the democratic process - Chief Electoral Officer Shrikant Deshpande

मतदानाचा टक्का सातत्याने घसरत आहे त्यावर आयोगाकडून काय उपायोजना केल्या जात आहेत ?

वरिल प्रश्नांवर बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करायची गरज आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने स्वीप नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी शाळा काॅलेजमध्ये ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन केला जाणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांसाठी असणार आहे. यातून मतदान जागृती अभियान चालवले जाणार आहे. तसेच गेल्या दीड वर्षांपासून ‘लोकशाही गप्पा’ हा उपक्रम राज्यात हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, साहित्यिक या घटकांबरोबर परिसंंवाद घेतले जात आहेत. तसेच याशिवाय अनेक उपक्रम राबवले जात आहेत. राष्ट्रीय मतदार दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करून जनजागृती केली जात आहे.

Voter registration process will be simplified so that nomads can enter the democratic process - Chief Electoral Officer Shrikant Deshpande

मतदार नोंदणी ही लोकशाहीची पहिली पायरी

यावेळी बोलताना देशपांडे म्हणाले की, मतदार नोंदणी ही लोकशाहीची पहिली पायरी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले नाव मतदारयादीत आहे किंवा नाही हे पहावं,जर नसेल तर नोंदवावं; तसेच कुठलीही निवडणूक असो, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे सांगत मतदान नोंदणीची प्रक्रिया पुर्वी वर्षातून एकदा असायची परंतू आता यात बदल झाला असून वर्षांतून चार वेळा मतदान नोंदणी करण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नोंदणी करावी असे अवाहन यावेळी त्यांनी केले.

मतदान कार्ड आहे म्हणून मतदानाचा अधिकार आहे हेच मुळात गैर

मतदान कार्ड आहे म्हणून तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे हेच मुळात गैर आहे, चुकीचं आहे. मतदारयादीत नाव असेल तरच मतदानाचा अधिकार प्राप्त होतो, त्यामुळे मतदानापासून आपण वंचित राहू नये, यासाठी आपण आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, याची ऑनलाईन खात्री करावी, असे अवाहन देशपांडे यांनी केले.

मतदारसंख्या वाढल्यास ‘या’ निवडणूका अर्थपुर्ण होतील

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका अतिशय कमी मतदारात होतात परंतू या मतदारसंघात मतदारसंख्या वाढावी यासाठी आयोग आग्रही आहे, त्यासाठी आयोगाने शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, उद्योग विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, कृषी विभाग यांना सर्क्यूलर पाठवले आहेत. जे जे पदवीधर आहेत त्यांची मतदार नोंदणी करावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. मतदारांची संख्या वाढल्यास या निवडणूका अर्थपुर्ण होतील असेही यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी स्पष्ट केले.