धक्कादायक : साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचे घरात आढळले मृतदेह, मृतांमध्ये आई, वडील व दोन मुलांचा समावेश, आत्महत्या की घातपात पोलिस तपास सुरू

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई, वडील व दोन मुलांचा समावेश आहे. ही धक्कादायक घटना पाटण तालुक्यातील सणबुर गावातून उघडकीस आली आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेतली. सदर घटना ही हत्या की आत्महत्या याचा पोलिसांकडून वेगाने तपास केला जात आहे. (Satara Patan Sanbur latest news today)

Shocking news, Dead bodies of four members of same family were found in house in sanbur village Satara, police investigation into suicide or accident is underway, Patan satara latest news,

पाटण तालुक्यातील सणबुर गावातील निवृत्त शिक्षक आनंदराव पांडुरंग जाधव, सुनंदा आनंदराव जाधव, मुलगा संतोष जाधव, मुलगी पुष्पा प्रकाश धस या एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मयत आनंदराव पांडुरंग जाधव हे आपल्या कुटुंबासह पाटण तालुक्यातील सणबुर गावात राहत होते. जाधव यांचे घर गावात आडबाजूला आहे. आज सकाळी त्यांच्या घरातून कोणीच बाहेर आले नाही, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. नातेवाईकाने गावकऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला असता धक्कादायक दृश्य समोर आले. घरात चौघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.

सदर घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सदरचे मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत कराड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले.

ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा जाधव हे काही दिवसांपासून आजारी होते. कराड येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारांनंतर त्यांना पुन्हा घरी आणले होते. घरात त्यांच्यासाठी ऑक्सिजनची सुविधाही करण्यात आली होती.

गुरुवारी सर्वजण एकत्रित होते. गुरुवारी रात्री पुष्पा धस यांच्या मुलाने त्यांना फोन करुन सगळ्यांची चौकशीदेखील केली होती. तसंच, आजोबांच्या तब्येतीची विचारपूसदेखील केली होती. मात्र, अचानक एका रात्रीत काय घडलं हे मात्र गूढ आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

सणबूर गावापासून काही अंतरावर जाधव कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते. कुटुंब प्रमुख आनंदा जाधव हे शिक्षक होते. गावापासून काही अंतरावर हे कुटुंब राहत असल्यामुळे हा प्रकार लवकर निदर्शनास आला नाही. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्युने सणबूर गाव सुन्न झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून नागरीकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वैद्यकीय पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून प्राथमिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. जाधव कुटूंबीय गावापासून दूर राहत असल्यामुळे हा प्रकार नेमका कोणत्या वेळी घडला? याचा देखील तपास सुरू आहे.