IT Engineer Saurabh Patil Murder Case : शिर्डीच्या आयटी इंजीनिअर सौरभ पाटील खून प्रकरणात मोठी घडामोड, पुणे पोलिसांनी कोपरगाव येथून केली एकास अटक, खुनाचे मोठे कारण आले समोर
IT Engineer Saurabh Patil Murder Case : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील सौरभ पाटील (Saurabh Patil Shirdi) या आयटी अभियंत्याच्या खून प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. सौरभ पाटील खून प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांनी कोपरगाव येथून एकाला अटक केली आहे. मयूर संदिप दळवी (Mayur Dalvi kopargaon) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
राहता तालुक्यातील शिर्डी येथील रहिवासी असलेला सौरभ नंदलाल पाटील (वय 23) हा तरूण पुणे शहरातील हिंजवडी येथील एका साॅप्टवेअर कंपनीत आयटी अभियंता म्हणून नोकरीस होता. परंतू तो 28 जूलै 2023 पासून अचानक बेपत्ता झाला होता.सौरभशी कुटुंबियांचा संपर्क होत नसल्याने त्याचे नातेवाईक संदिप सोनवणे यांनी हिंजवडी पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. (Saurabh Patil Murder Case)
त्यानुसार पुणे पोलिसांनी बेपत्ता सौरभ पाटील या तरूणाचा शोध सुरु केला होता. 5 ऑगस्ट 2023 रोजी पुणे – नाशिक महामार्गावरील सांडभोरवाडीजवळच्या वनविभागाच्या हद्दीत त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून होता. तर होलवाडी गावात त्याची दुचाकी आढळून आली होती. गाडीची चावी जवळच्या विहीरीच्या कठड्यावर पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळावर केलेल्या शवविच्छेदनात सौरभ पाटील या तरूणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आयटी अभियंता सौरभ पाटील खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पुणे पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. या प्रकरणाचा पोलिस वेगाने तपास करत होते.पुणे पोलिसांनी सौरभ पाटील हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार मयुर दळवी या तरूणाला कोपरगाव (Kopargaon) येथून अटक केली आहे. (Mayur Dalvi Arrest)
सौरभ पाटीलची हत्या का करण्यात आली ?
आरोपी मयुर दळवी व मयत सौरभ पाटील या दोघांमध्ये काही महिन्यांपुर्वी कोपरगावमध्ये मोठा वाद झाला होता. मयुर हा पुण्यात नोकरी आला होता. परंतू मयुरच्या मनात सौरभ विषयी राग होता. याच रागातून मयुर दळवी याने हत्या केली. असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
खुन्नसने पाहिल्यामुळे सौरभला संपवलं
कोपरगाव येथील संजीवनी काॅलेजमध्ये शिक्षण घेत असताना सौरभ पाटील याने आरोपी मयुर दळवी याच्याकडे खुन्नसने पाहिले होते. याच कारणामुळे दोघांमध्ये काही महिन्यांपुर्वी मोठा वाद झाला होता. दोघांचे कडाक्याचे भांडण झाले होते. याच रागातून मयुर दळवी याने सौरभ पाटील याची चाकुने वार करत तसेच दगडाने ठेचून हत्या केली, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले.