खळबळजनक : कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पुन्हा राडा, भाजपा नेते सचिन पोटरे व त्यांच्या कुटूंबियांवर हल्ला, कर्जत पोलिसांत 7 जणांविरोधात गुन्हे दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Falke) यांच्या बंगल्यावर काळे फासण्याची घटना ताजी असतानाच, आता कर्जतमध्ये (Karjat) पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP Worker Attack) राडा केल्याची दुसरी घटना घडली आहे. या घटनेत भाजपाचे (BJP) जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे (Sachin Potre ) आणि त्यांच्या कुटूंबियांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. पोटरे मारहाण प्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनला (Karjat police station) 7 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Sensational, NCP activists attack again in Karjat, attack on BJP leader Sachin Potre and his family, Karjat police registers cases against 7 people, karjat news today,

कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार (MLA Ram Shinde vs MLA Rohit Pawar) या दोन नेत्यांमधील संघर्ष सर्वश्रुत आहे. दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आता कार्यकर्त्यांमध्ये येऊन ठेपला आहे. राष्ट्रवादीचा मागील 15 दिवसांत तीन निवडणुकांमध्ये मानहानिकारक पराभव झाल्यापासून राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. पराभव सहन न झाल्याने अस्वस्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या बंगल्यावर काळे फासत ‘गद्दार’ हा शब्द लिहिण्याचा ‘महापराक्रम’ केल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपा नेते सचिन पोटरे (Sachin Potare Karjat BJP) आणि त्यांच्या कुटूंबियांवर हल्ला केल्याची दुसरी राजकीय घटना घडली आहे.

सचिन पोटरे यांना मारहाण का झाली ?

भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी एका दैनिकाने फेसबुकवर पेजवर प्रकाशित केलेल्या बातमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची बाजू घेणारी एक कमेंट पोस्ट केली होती, यात पोटरे यांनी म्हटले होते की, ज्यावेळी एक नेता बाहेरून येतो, विरोधकांना दादागिरी, दहशतीचे व दडपशाही करून वेठीस धरण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःच्या पक्षाच्या भूमिपुत्र असणाऱ्या जिल्हाध्यक्षांच्या घरावर आपल्या टोळक्याला दगडफेक करून मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येतो, त्यावेळी त्याची फक्त राजकीय अपरिपक्वताच दिसून येत नाही तर तो त्यांच्या नव्या पर्वाची राजकीय सीमा सुद्धा सीमित करत असतो. टोळी राजकारणाचा जाहीर निषेध.

सचिन पोटरे यांनी फेसबुक पेजवर टाकलेल्या कमेंटखाली 15 जून रोजी रात्री साडेआठ वाजता कर्जत तालुक्यातील बहिरोबाडी येथील सोमनाथ रोहीदास यादव यांनी कमेंट केली की, भारतीय जनता पार्टी तुम्हाला किती पगार आणि पॅकेज देते,की तुम्ही अशा सतत पोष्ट आणि कमेंट करत असतात.त्यावर पोटरे यांनी उत्तर देत कमेंट केली की,आम्ही पगारवर व पॅकेजवर कधीच नव्हतो,आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही कोणाला कधी घाबरलो नाही. आमचे दोन नंबरचे धंदे नाहीत,वाळूच्या गाड्या नाहीत आणि ठेकेदारी पण नाही मात्र तुम्ही कशावर आहात त्याचा पण खुलासा करा…? अशी कमेंट केल्याचा राग आल्याने सोमनाथ रोहीदास यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सचिन पोटरे यांच्या घरी जात मारहाण केली.

सचिन पोटरे यांच्या घरी नेमकं काय घडलं ?

दरम्यान, भाजपा नेते सचिन पोटरे हे 15 जून 2023 रोजी रात्री 9 वाजता आपल्या घरी जेवण करत असताना बहिरोवाडी येथील सोमनाथ रोहीदास यादव याने आपल्या 7744070099 या नंबरवरुन सचिन पोटरे यांच्या 8888764888 या फोनवर फोन करत दोनदा खाली येण्यास सांगितले. तेव्हा पोटरे यांनी त्यांना वर बोलवले परंतू ते वर गेले नाही. त्यावेळी पोटरे यादव यांना म्हणाले की, मला काय मारणार आहे का ? मारुन टाकणार आहे का? हात पाय मोडणार आहे? असे म्हणताच यादव पोटरे यांना म्हणाला की, तु खाली ये, तुला मारणार का हातपाय मोडणार ते माझे मी बघुन घेईल, तु खाली ये. असे म्हणाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सचिन पोटरे आणि कुटुंबियांना मारहाण शिविगाळ

भाजपा नेते सचिन पोटरे यांच्या श्रीकृष्ण दुकानासमोर सोमनाथ रोहीदास यादव, सुधीर रामदास यादव हे इतर पाच ते सहा लोकांना घेऊन थांबले होते. यावेळी ते मोठमोठ्याने शिविगाळ करत होते. त्यावेळी पोटरे यांचा मुलगा कृष्णा पोटरे हा त्याठिकाणी मोबाईलमध्ये शुटींग करत असताना त्याला सोमनाथ यादव याने चापटाने मारहान करत त्याचा ॲपल कंपनीचा मोबाईल फेकुन दिला. मारहाण सुरू असतानाच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सोमनाथ रोहीदास यादव याने श्रीकृष्ण पोटरे याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सोमनाथ रोहीदास यादव व सुधीर रामदास यादव दोन्ही रा बहीरोबावाडी ता कर्जत व इतर चार ते पाच लोकांनी सचिन पोटरे यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या कुटूंबियांवर हल्ला करण्याची घटना उघडकीस येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कर्जत पोलिसांत सात जणांविरोधात गुन्हे दाखल

भाजपा नेते सचिन पोटरे यांच्या फिर्यादीवरून 15 जून रोजी रात्री उशिरा सोमनाथ रोहीदास यादव व सुधीर रामदास यादव दोन्ही रा बहीरोबावाडी ता कर्जत व इतर चार ते पाच अश्या सात लोकांविरुध्द कलम 143, 294, 323, 354, 504, 506, 507, 427 या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास कर्जत पोलिस करत आहेत.