खळबळजनक : डाॅक्टरने संपवले अख्खे कुटूंब, तिघांची हत्या करत स्वता: केली आत्महत्या, धक्कादायक घटनेने पुणे जिल्हा हादरला !

दौंड – पुणे : महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना आज पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे.पुणे (Pune Crime news) जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड (daund Varvand) येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी आढळून आली आहे. वरवंड येथील डाॅक्टरने आपली पत्नी, दोन मुले अश्या तिघांची हत्या (murder) करत स्वता: आत्महत्या (suicid) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Dr Atul divekar latest news)

Sensational, doctor Atul Divekar killed his entire family with himself, shocking incident shook Pune district, daund varvand murder news, Atul Divekar latest news,

दौंड तालुक्यातील वरवंड येथील चैताली पार्क येथे राहत असलेल्या डाॅ अतुल शिवाजी दिवेकर (Dr Atul Shivaji Divekar) यांच्या घरातून ही धक्कादायक घटना 20 जून रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेत पल्लवी अतुल दिवेकर (डाॅ अतुल यांची पत्नी Pallavi Divekar), वेदांतिका (मुलगी) अदत्विक (मुलगा) अशी हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत. तर डाॅ अतुल दिवेकर यांनी स्वता: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज उघडकीस आली. डॉ दिवेकर यांच्या घरा शेजारील व्यक्तींनी पाहणी केली असता ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली.(Atul Divekar news)

घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळी डाॅ अतुल दिवेकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी पल्लवी यांचा मृतदेह दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी पोलिसांनी पाहणी केली असता घटनास्थळावर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली.

मी पत्नीचा गळा आवळून तर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांचा खून केला. मी स्वता: आत्महत्या करत असल्याचे या चिठ्ठीत नमुद होते. त्यानुसार पोलिसांनी लहान मुलांचे मृतदेह शोधण्यासाठी चिठ्ठीत नमुद विहीर गाठली. विहिरीला पाणी जास्त असल्याने मृतदेह आढळून आले नाही. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम वेगाने सुरू होते.

डाॅक्टरने स्वता:सह अख्खं कुटूंब संपवल्याच्या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमागच्या कारणांचा पोलिस वेगाने शोध घेत आहेत. दरम्यान, मयत डाॅक्टर अतुल दिवेकर हे व्यवसायाने पशुवैद्यकीय डाॅक्टर होते. तर त्यांच्या पत्नी ह्या शिक्षिका होत्या. डाॅ दिवेकर यांनी इतक्या टोकाचा निर्णय का घेतला असावा याचा तपास पोलिस वेगाने करत आहेत. या घटनेमुळे वरवंड गावावर शोककळा पसरली आहे.