शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बबन पाचारणे यांची निवड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बबन पाचरणे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

हळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी नुकतीच बैठक पार पडली यात अध्यक्षपदासाठी बबन पाचारणे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर पाचरणे यांचा समितीच्या सदस्यांनी सत्कार केला.

बबन पाचरणे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ नेते किसनराव ढवळे, सरपंच अनिताताई ढवळे, उपसरपंच आबासाहेब ढवळे, पै राजू भैय्या सय्यद, तात्या लांडे, शांतीलाल लांडे, अमित ढवळे, मुख्याध्यापक हजारे सरांसह आदींनी अभिनंदन केले आहे.

शालेय व्यवस्थापन समिती सदस्य खालील प्रमाणे

पुजा संदिप रंधवे, नामदेव मोतीराम जाधव, गायत्री जयंतकुमार सोनवणे, सोनाली गणेश दळवी, रब्बाना बाबुलाल सय्यद, कासम शेख, जयश्री महादेव ढवळे, सुनिता जयद्रथ कापसे, जिजाबाई गणेश ढवळे, सुनिल मुरलीधर ढवळे, देविदास भाऊराव भालेराव, दिपक धनंजय ढवळे, किसन आण्णासाहेब ढवळे, अशोक नाना ढवळे, भारती शरद हिरडे, रोहिणी रामदास माने.