Satara ACB Trap Today : 1 लाख रूपयांची लाच स्विकारताना सहाय्यक पोलीस निरिक्षकासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, सातारा पोलीस दलात उडाली खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Satara ACB Trap Today : 1 लाख रूपयांची लाच स्विकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्या दोघा पोलीस अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्याची धडक कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Satara ACB Trap) पथकाने आज पार पाडली. ही कारवाई सातारा जिल्ह्यातील औंध पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात करण्यात आली. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, सातारा जिल्ह्यातील  खटाव तालुक्यातील औंध गावातील एका परमिट रुम मधुन दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे औंध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात 42 वर्षीय तक्रारदारास मदत करण्यासाठी व तक्रारदार याला त्याच्या व्यवसायात इथुन पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय परशुराम दराडे (API Dattatraya Darade) व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब नारायण जाधव (ASI Bapusaheb Jadhav) या दोन अधिकाऱ्यांनी दीड लाख रूपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्यामुळे तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली होती.

सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यासाठी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज 11 ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यात सत्यता आढळून आल्यानंतर एसीबीने सापळा कारवाई केली.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय परशुराम दराडे यांच्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब नारायण जाधव यांनी तक्रारदाराकडून एक लाख रूपयांची लाच स्वीकारताच सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बापूसाहेब जाधव यांना ताब्यात घेतले. ही कारवाई जुना एस टी स्टँड, बाजार पटांगण, औंध, ता.खटाव, जि.सातारा येथे करण्यात आली.

Satara ACB Trap Today, Aundh Police Station Assistant Police Inspector Dattatraya Parasuram Darade and Assistant Police Sub Inspector Bapusaheb Narayan Jadhav in ACB trap while accepting bribe of 1 lakh rupees,

औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय परशुराम दराडे (Assistant Police Inspector Dattatraya Parashuram Darade) व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब नारायण जाधव (Assistant Sub-Inspector of Police Bapusaheb Narayan Jadhav) या दोघा अधिकाऱ्यांविरुद्ध औंध पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती सापळा अधिकारी पोलिस उपअधिक्षक श्रीमती उज्वल अरुण वैद्य (Deputy Superintendent of Police Ujwal Arun Vaidya) यांनी दिली. कारवाईच्या पथकात पो.ना. निलेश चव्हाण, पो.शि तुषार भोसले, पो. शि. निलेश येवले यांचा समावेश होता.

Respected sir Trap Case Report

घटक :- सातारा
तक्रारदार :- पुरुष, वय 42 वर्ष
आरोपी लोकसेवक :- 1) दत्तात्रय परशुराम दराडे, सहायक पोलीस निरीक्षक, नेमणुक – औंध पोलीस स्टेशन, 2) बापुसाहेब नारायण जाधव, वय 54 वर्ष, सहायक पोलीस उपनिरीक्षक, नेमणुक – औंध पोलीस स्टेशन

लाच मागणी :- 1,50,000/- रुपये
लाच स्विकारली :-  तडजोडीअंती 1,00,000/- रुपये
पडताळणी दिनांक :- 11/08/2023.
सापळा दिनांक व ठिकाण :- दिनांक 11/08/2023 रोजी  जुना एस टी स्टँड, बाजार पटांगण, औंध, ता.खटाव, जि.सातारा

हकीकत :- यातील तक्रारदार यांचे परमिट रुम मधुन दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे औंध पोलीस स्टेशनला दाखल असले गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व तक्रारदार यांना त्यांचे व्यवसायात इथुन पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी आरोपी लोकसेवक क्र.1 व 2 यांनी 1,00,000/- रु. लाचेची मागणी करुन व आलोसे क्र.1 यांच्यावतीने आलोसे क्र 2 यांनी 1,00,000/- रु. लाच रक्कम  स्विकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, औंध पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सापळा पथक :-  पोलीस उपअधीक्षक – श्रीमती उज्वल अरुण वैद्य, पो.ना.2028, निलेश चव्हाण, पो.शि.669 तुषार भोसले, पो. शि.248 निलेश येवले, सर्व नेमणूक – ला.प्र.वि. सातारा.

मार्गदर्शन अधिकारी :- श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र. 2) श्रीमती शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.

श्रीमती उज्वल अरुण वैद्य,पोलीस उपअधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा
मोबाईल क्र. 9823231244
कार्यालय क्र. 02162-238139
ईमेल dyspacbsatara@gmail.com , dyspacbsatara@mahapolice.gov.in
टोल फ्री क्र. 1064