Sadabhau Khot criticized the government | सदाभाऊंची चिभ घसरली;म्हणाले महाराष्ट्रात तालिबान सारख्या चौक्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Sadabhau Khot criticized the government | राज्यात सध्या बैलगाडी शर्यतीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यत आयोजीत केली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचल्यानंतर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात जहरी टिका करत तालिबान (Taliban) सारख्या चौक्या उभ्या करून बैलगाडा शर्यती पोलिसांच्या बळावर चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. (Sadabhau Khot criticized the government for trying to crush the bullock cart race police force by setting up outposts like the Taliban.)

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या झरे या ठिकाणी उद्या 20 ऑगस्ट रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलं आहे.(MLA Gopichand Padalkar has organized a bullock cart race in Jare village in Atpadi taluka of Sangli district.)

या शर्यतीच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण भलतेच पेटले आहे. पडळकर विरूध्द प्रशासन असा जोरदार संघर्ष निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून 9 गावाच्या आसपास संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे या नाका बंदीचा फटका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाही बसला (Sadabhau Khot criticized the government)

सदाभाऊ खोत हे झरे गावाकडे जात असतानाच पोलीस प्रशासनाकडून त्यांना रोखून धरण्यात आले होते. परवानगी नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारण्याची भूमिका घेतल्याने अखेर पोलिसांकडून त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर खोत यांनी झरे या ठिकाणी दाखल होत प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या बाबतचे वृत्त न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने दिले. (Sadabhau Khot criticized the government)