- Advertisement -

abduction thriller at midnight in Jamkhed | जामखेडमध्ये मध्यरात्री रंगले अपहरणाचे थरारनाट्य : पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या !

दहा लाखाच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच रचला घरमालकाच्या अपहरणाचा डाव

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : abduction thriller at midnight in Jamkhed | दहा लाखाच्या खंडणीसाठी घरमालक असलेल्या तरूणाचे अपहरण करण्याचे थरारनाट्य पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाच्या टिमने हाणून पाडण्याची धमाकेदार कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्यसुत्रधारासह त्याच्या एका साथीदाराच्या अवघ्या तीन तासांत मुसक्या आवळण्याची मोठी कामगिरी जामखेड पोलिसांनी बजावली आहे.

जामखेड शहरातील बीड रोड भागात राहणाऱ्या कृष्णा अशोक साळुंके या तरूणाचे दहा लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्याचा डाव फसला आहे. कृष्णा साळूूंके याच्या मालकीच्या जागेत दीड वर्षापासून भाडेतत्त्वावर राहणाऱ्या योगेश सहादेव शिंदे ( रा सौताडा ता. पाटोदा) याने त्याच्या दोन साथीदारासह कृष्णाच्या अपहरणाचा डाव आखला होता. (abduction thriller at midnight in Jamkhed)

बुधवारी मध्यरात्री असा रंगला अपहरणाचा थरार (abduction thriller at midnight in Jamkhed)

बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कृष्णाच्या अपहरणाचे थरारनाट्य बीड रोड परिसरात घडले. कृष्णाच्या तोंडाला चिकटपट्टी लावून दोरीने बांधून गाडीत ( एम एच 12 एफ के 3897)  टाकण्यात आले होते. त्या आधी त्याला मारहाण करून त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावून हातपाय बांधून गाडीत टाकले. जर पळून गेला तर जीवे ठार मारू अशी धमकी योगेश व त्याच्या साथीदारांनी चाकूचा धाक दाखवून कृष्णाला दिली होती. मात्र कृष्णाने अपहरणकर्ते गाडीबाहेर असल्याची संधी साधत गाडीतून पळ काढला होता. (abduction thriller at midnight in Jamkhed)

यावेळी तो बीडरोडवर मदतीसाठी जोर जोराने ओरडत पळत सुटला होता. पण मुख्य आरोपी योगेश याने जर तु ओरडला अथवा पळाला तर तुझ्या आईला जिवे ठार मारू अशी धमकी दिली होती. त्यानंतर योगेश व त्याच्या साथीदाराने कृष्णाला फरफडत आणत गाडीत टाकले. तत्पूर्वी मध्यरात्री अचानक झालेल्या आरडा ओरडीमुळे  जागे झालेल्या नागरिकांनी साळुंके यांच्या घरी चोरी झालीय. तेथे मोठा गोंधळ सुरूयं अशी खबर पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना दिली. (abduction thriller at midnight in Jamkhed)

नागरिकांच्या जागरूकतेमुळे व पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी तातडीने गुन्हा शोध पथकाला घटनास्थळी पोहोचण्याच्या सुचना केल्या. अपहरणकर्ते कृष्णाला घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच डिबी पथकाने अत्यंत वेगाने घटनास्थळ गाठले. पोलिसांची गाडी पाहताच अपहरणकर्त्यांनी गाडी व कृष्णाला जागेवर ठेवत तेथून पळ काढला. पोलिसांना पाच ते दहा मिनिट जरी उशिर झाला असता तर खुप मोठा अनर्थ झाला असता परंतु पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड व त्यांच्या टीमने दाखवलेल्या चपळाईमुळे मोठा अनर्थ टळला. (abduction thriller at midnight in Jamkhed)

दरम्यान घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांच्या पथकाने कृष्णा साळुंके व त्याच्या आईला धीर दिला. त्यानंतर गाडीची झडती घेतली असता गाडीत चाकू, दोरी, चिकटपट्टी व एक सॅक आढळून आली. सॅकमध्ये एक आधारकार्ड पोलिसांच्या हाती लागले. ते आधारकार्ड कृष्णाला दाखवल्यानंतर अपहरण नाट्याचा मुख्य सूत्रधार हा भाडेकरू योगेश शिंदे असल्याचा उलगडा पोलिसांना झाला. (abduction thriller at midnight in Jamkhed)

गुन्हा शोध पथकाचे विशेष ऑपरेशन यशस्वी

दरम्यान कृष्णा साळूंकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारे कोण होते? त्यांचा मुखिया कोण होता ? याची ओळख पटल्यानंतर गुन्हा शोध पथकाने आरोपीच्या शोधासाठी आष्टी व पाटोद्याच्या दिशेने पोलिसांच्या दोन टिम रवाना झाल्या.आरोपींची माहिती काढत असतानाच पोलिसांना एका खबर्‍याकडून माहिती मिळाली की, आरोपी योगेश शिंदे हा जामखेडमधील त्याच्या प्रियसीच्या घरी असू शकतो. मग काय पोलिसांनी योगेशच्या प्रियसीचे घर गाठताच योगेश व ज्ञानेश्वर सरोदे या साथीदाराच्या जागेवरच मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील तिसरा आरोपी सचिन शिंदे हा फरार होण्यात यशस्वी झाला.(abduction thriller at midnight in Jamkhed)

जामखेड पोलिसांत तिघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

दरम्यान अपहरण नाट्य प्रकरणात गुरूवारी जामखेड पोलिस स्टेशनला कृष्णा अशोक साळुंके (वय 23) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश सहादेव शिंदे रा. सौताडा ता पाटोदा जि बीड व त्याचे दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध कलम 364 (A), 452, 511, 323, 506, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.(abduction thriller at midnight in Jamkhed)

कारवाईच्या पथकात यांचा होता समावेश

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल ,डी वाय एस पी शअण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड , सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे  ,गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात , पो ना.अविनाश ढेरे ,पो कॉ संग्राम जाधव , आबासाहेब आवारे ,अरुण पवार ,संदीप राऊत ,पो कॉ संदीप आजबे , पो कॉ विजयकुमार कोळी चालक पो हे कॉ हनुमान आरसुल, महिला पोलीस मनीषा दहिरे यांनी केली. (abduction thriller at midnight in Jamkhed)