कर्जत : राष्ट्रवादीच्या गुंडांविरोधात भाजप झाली आक्रमक, सचिन पोटरे हल्ला प्रकरणात कर्जत भाजपने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मोठी मागणी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे (Sachin Potare bjp) आणि त्यांच्या कुटूंबियांवर हल्ला करणाऱ्या राष्ट्रवादीच्या (NCP) गुंडांविरोधात कर्जत भाजप (Karjat BJP) आक्रमक झाली आहे.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज कर्जतचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी अरूण पाटील (DYSP Arun Patil) यांची भेट घेऊन पोटरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी,अशी मोठी मागणी केली आहे. त्याचबरोबर कर्जत तालुका टोळीमुक्त, दहशतमुक्त, करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.

Sachin Potare attack case, BJP became aggressive against Karjat NCP goons, Karjat BJP made big demand to Home Minister Devendra Fadnavis and Karjat Police,

भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे व त्यांच्या कुटूंबियांवर हल्ला करण्याची घटना दोन दिवसांपुर्वी घडली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या बंगल्यावर काळे फासण्याच्या घटनेविरोधात सचिन पोटरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. फाळके यांची बाजू घेत टोळी राजकारणाचा निषेध पोटरे यांनी नोंदवला होता, या कारणाने बहिरोबावाडी येथील राष्ट्रवादीच्या गुंडांनी पोटरे यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी 7 हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल आहेत. सचिन पोटरे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचा कर्जत भाजपकडून आज निषेध नोंदवण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या गुडांवर कठोर कारवाई कारवाई करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. नही चलेंगी नही चलेंगी दादागिरी नही चलेंगी, अश्या घोषणांनी पोलिस उप अधिक्षक कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.

भाजपचे कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या विरोधात सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, विविध वृत्तपत्रे व जाहीर भाषणात सातत्याने विधायक टिका करत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी दि १५/०६/२०२३ रोजी रात्री ९ वाजता कर्जत येथे भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर दक्षिणचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे व त्यांच्या कुटूंबीयांवर हल्ला केला. याबाबत सचिन पोटरे यांनी कर्जत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात आ.रोहित पवार यांच्या दबावाने सचिन पोटरे आणि त्यांच्या कुटूंबावर पोलीस प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केला आहे. पोटरे यांच्या घरी जाऊन हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी उलट पोटरे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर खोटे गुन्हे मागे घ्यावेत व संबंधीत गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कर्जत भाजपकडून करण्यात आली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या साडेतीन वर्षांपासून लोकशाही पध्दतीने सचिन पोटरे व त्यांचे सहकारी विविध पध्दतीने आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणावर सातत्याने विविध माध्यमांत लिहीत आहेत.याशिवाय अनेक जाहीर कार्यक्रमात आंदोलनात त्यांच्यावर जाहीर टिका केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रवादीच्या गुंड कार्यकत्यांनी सचिन पोटरे यांच्यासहित अनेक कार्यकत्यांना दमबाजी, दादागिरी व दहशत करून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या अनेकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे  दाखल आहेत. त्या सर्वांचे अवैध व्यवसाय चालू आहेत. सोशल मिडीयावर ही टोळी सक्रीय आहे. व्यक्तीगत पातळीवर येऊन अनेकांची बदनामी करण्याचा व आवाज बंद करण्याचा या टोळीचा प्रयत्न असतो. यावरही परिणाम झाला नाही तर मग समाज माध्यमांवर, फोनवर व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जाहीर धमक्या देणे, मारहाण करून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो.

सचिन पोटरे यांच्याबाबत असे अनेकदा घडले आहे. पोटरे यांनी कर्जत पोलीस स्टेशनला दोन तीन वेळा तक्रार नोंदविली आहे. परंतु त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असल्याने व लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव असल्याने कुठलीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. तसेच अनेक सर्वसामान्य स्थानिक जनतेला पण या संघटित गुन्हेगारांचा त्रास असून त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारींवर देखील कोणीही अधिकारी कारवाई करण्याचे धाडस करीत नाहीत.परंतु आता भाजपा व युतीचे सरकार असल्याने या सर्व संबंधीतांवर याआधी असणाऱ्या सर्व गुन्हयांची, तक्रारींची चौकशी करुन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मोठी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, निःपक्षपातीपणे कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची कर्जतला नेमणूक करावी, राष्ट्रवादीच्या गुंड टोळीचा प्रमुख व पदाधिकारी यांचा पोलिस स्टेशनमध्ये असणारा वावर कायमस्वरूपी बंद करावा,सर्व गुंडांवर वचक निर्माण करावा, कर्जत तालुका टोळीमुक्त दहशतमुक्त करुन इथे लोकशाही पध्दतीने जनतेला बोलण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी कर्जत भाजपने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन भाजपने कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी यांना आज दिले आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपा नेते प्रविण घुले, तालुकाध्यक्ष डाँ.सुनील गावडे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, काका धांडे , सुनील यादव, शेखर खरमरे, अभय पाटील, दादा सोनमाळी, अनिल गदादे, गणेश पालवे, उदयसिंग परदेशी, राहुल निंभोरे , तात्या माने, शोएब काझी, पप्पू धोदाड, रुद्रा भिसे, सुदर्शन कोपनर गणेश जंजिरे, आबा गोसावी सह आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sachin Potare attack case, BJP became aggressive against Karjat NCP goons, Karjat BJP made big demand to Home Minister Devendra Fadnavis and Karjat Police,