खर्डा परिसरातील पत्रकारांचा क्रांतिकारी निर्णय : खर्डा प्रेस क्लबची स्थापना, अध्यक्षपदी संतोष थोरात यांची निवड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील विविध दैनिकांमध्ये आणि डिजीटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर आज एक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. सर्व पत्रकारांनी एकत्रित येत खर्डा प्रेस क्लबची स्थापन केली. हे सर्व पत्रकार जामखेड पत्रकार संघात कार्यरत होते.

Revolutionary decision of journalists in Kharda area, establishment of Kharda Press Club, election of Santosh Thorat as President

बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त खर्डा येथील पत्रकारांनी खर्डा प्रेस क्लबची स्थापना करत पत्रकार दिन साजरा केला. खर्डा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी लोकमतचे पत्रकार संतोष थोरात तर उपाध्यक्षपदी प्रभातचे पत्रकार तुळशीदास गोपाळघरे तर सचिवपदी लोक आवाजचे पत्रकार अनिल धोत्रे तर कार्याध्यपदी शिवपट्टण टाइम्सचे संपादक दत्तराज पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

खर्डा प्रेस क्लबची कार्यकारिणी खालीलप्रमाणे

संतोष थोरात – अध्यक्ष
तुळशीदास गोपाळघरे – उपाध्यक्ष
अनिल धोत्रे – सचिव
पांडुरंग गर्जे – सहसचिव
दत्तराज पवार – कार्याध्यक्ष
किशोर दुशी – खजिनदार / सल्लागार
बाळासाहेब शिंदे – प्रसिध्द प्रमुख
श्वेता गायकवाड  – सदस्य
धनसिंग साळुंके – सदस्य
प्रा महेश बजगुडे – सदस्य
आशुतोष गायकवाड – सदस्य
गणेश जव्हेरी  – सदस्य