जामखेड: वाचाळवीर रोहित पवारांच्या अरेतुरेच्या भाषेला सडेतोड उत्तर देऊ – रविंद्र सुरवसे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसी संदर्भात केलेल्या अंदोलनानंतर आमदार प्रा.राम शिंदे आणि सरकारला बघतोच आता असे म्हणत अरेरावीची भाषा वापरली, या वक्तव्याचा जोरदार समाचार घेत, वाचाळवीर रोहित पवारांच्या दादागिरीच्या भाषेला सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी दिला आहे. (Karjat Jamkhed MIDC News)

यावेळी बोलताना भाजपा विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे म्हणाले की, विधानभवनामध्ये कर्जत जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्याबद्दल खालच्या पातळीवर अरेतुरेची भाषा वापरून वाचाळवीर रोहित पवारांनी जी दादागिरीची भाषा वापरलीय त्या भाषेला कर्जत आणि जामखेड तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा सुरवसे यांनी दिला आहे.

Ravindra Suravase strong attack against mla Rohit Pawar, will give complete answer to Rohit Pawar's rhetorical language - Ravindra Suravase

सुरवसे पुढे म्हणाले की, गेल्या चार वर्षाच्या काळात कुठल्याही प्रकारच्या विकासाचं काम आमदार रोहित पवारांनी केलं नाही. आणि आता येणार्या काळात मी काही तरी करतोय असं दाखवण्यासाठी अंदोलनं करायचे उद्योग सुरु केले आहेत. खालच्या पातळीवर भाषा वापरणाऱ्या आमदार रोहित पवार यांचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो, असे भाजपाचे विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे म्हणाले.