जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक आघाडीच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी नंदकिशोर खरात यांची निवड निवड करण्यात आली आहे. खरात हे गेल्या काही वर्षांपासून चळवळीत सक्रिय आहेत.त्यांना नुकतेच निवडीचे पत्र पक्षाकडून प्रदान करण्यात आले.
निवडीच्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय समाज पक्षात आपली कार्य करण्याची तीव्र इच्छाशक्ती याचा आम्हाला अभिमान वाटतो म्हणून युवक तालुकाध्यक्ष-जामखेड या पदावर आपली नियुक्ती करण्यात येत आहे.सदर नियुक्तीचा कार्यकाल पक्षाच्या ध्येय व धोरणाद्वारे पक्षातील कार्याच्या विश्लेषणावर अवलंबुन असेल.आपली निवड ही पक्षाच्या घटनेनुसार १ वर्षासाठी करण्यात आली आहे.
आपण या पदावर पक्षात कार्यरत असताना पक्षाचे सर्व नियम व अटींशी बांधील आहात.आपल्या निवडीने पक्ष आणि लोकबंधु महादेवरावजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष यांची विचारसरणी सर्व समाजातील सामान्यांपासून उच्च पदस्थांपर्यंत पोहोचेल व पक्षाचे कार्य जोमाने वाढेल असा विश्वास आहे.
आपण आपल्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्येकर्ते बंधु-भगिनीमध्ये पक्षाचा आदर व शिस्त अबाधित ठेवाल ही अपेक्षा आहे.येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाला यशस्वी करून आपण आपली निवड सार्थ ठरवाल असा विश्वास आहे.
भावी काळातील आपला कार्यकाल पक्षाला फलदायी ठरो. यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या आपल्याला हार्दीक शुभेच्छा असे म्हटले आहे. या पत्रावर अहमदनगर लोकसभा प्रभारी रविंद्र कोठारी, पक्षाचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष, अहमदनगर दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर यांच्या सह्या आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक आघाडीचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष नंदकिशोर सयाजी खरात हे जामखेड तालुक्यातील हळगाव गावचे रहिवासी आहेत.ते गेल्या काही वर्षांपासून बहुजन चळवळीत सक्रिय आहेत.पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक अंदालने, मोर्चे यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी हाती घेतलेली अनेक अंदालने गाजली आहेत.
दरम्यान खरात यांच्या निवडीबद्दल सर्वच क्षेतातून अभिनंदन केले जात आहे. दरम्यान, नंदकिशोर खरात यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हळगाव मधील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील यशस्वी राजकीय वाटचालीस गावकऱ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. जन्मभूमीत झालेल्या सत्काराने खरात हे भारावून गेले होते.