Protest against the arrest of Maulana Kalim Siddiqui in Jamkhed | मौलाना कलिम सिद्दीकींच्या अटकेचा जामखेडमध्ये निषेध

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Protest against the arrest of Maulana Kalim Siddiqui in Jamkhed | उत्तर प्रदेश सरकारने मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना कलिम सिद्दीकी यांना एटीएस मार्फत केलेली अटक संविधानाच्या विरोधी आहे. त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत. मौलानाच्या अटकेचा निषेध करत त्यांना लवकरात लवकर सोडण्याची मागणी जमियत ए उलमा हिंद व समस्त समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देतांना जमियत ए उलमा जामखेड तालुकाध्यक्ष मौलाना खलील कासमी, शहराध्यक्ष मुफ्ती अफजल पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर राळेभात, अरूण जाधव, अझरुद्दीन काझी,नाजिम काझी, शेरखान पठाण, जुबेर शेख, अब्दुलबारी कुरेशी, नजीर सय्यद, समीर पठाण, फहिम शेख,वसीम सय्यद, अतिक पिंजारी, राजुभाई शेख, गनीभाई शेख, अस्लम खान असे मोजके नागरीक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की मौलाना कलिम सिद्दीकी यांच्यावर लावलेले आरोप निराधार असुन उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योगी सरकार राजकीय पोळी भाजून घेत आहे. एटीएस मार्फत समाजात दहशत व जातीय तेढ निर्माण करत आहे. सविधानाने दिलेल्या आधिकाराचे हनन करत आहे. प्रत्येक वेळी कोणाला तरी टार्गेट केले जात आहे.राजकीय हेतूने केलेल्या अटकेचा निषेध करत मौलाना कलिम सिद्दीकी यांना लवकर सुटका करण्याची मागणी करण्यात आली.

web titel : Protest against the arrest of Maulana Kalim Siddiqui in Jamkhed