Revenue Department | जामखेड महसुल विभागाची दमदार कामगिरी : एकाच दिवसांत वाटप केले 6280 खातेदारांना मोफत सातबारा उतारे

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यातील शेतकर्‍यांना सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत मोफत डिजीटल साडेबारा उतारे देण्याची मोहिम महाराष्ट्र शासनाने हाती घेतली आहे. गांधी जयंती दिवशी सुरू झालेल्या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जामखेड महसुल विभागाने एक विक्रम प्रस्थापित केला. एकाच दिवशी 6280 खातेदारांना मोफत सातबारा उतारे देण्यात आले आहेत. तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड महसुल विभागाने सातबारा वाटपाच्या मोहिमेत दमदार एन्ट्री केली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत खातेदारांना मोफत 7/12  उताऱ्यांचे वाटप केले जाणार आहेत. या मोहिमेचा शनिवारी जामखेड तालुक्यात तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

Strong performance of Jamkhed Revenue Department Distributed free Satbara transcripts to 6280 account holders in a single day.

जामखेड तालुक्यात एकूण 49456 एवढे 7/12  असून 71234 एवढे खातेदार आहेत. शनिवारी जामखेड तालुक्यातील 31 सज्यामधील प्रत्येकी एका गावामध्ये  7/12 चे मोफत वितरण मोहिमेला सुरवात करण्यात आली. दिवसभरात जामखेड तालुक्यामध्ये एकुण 6280 एवढ्या खातेदारांना मोफत 7/12 चे वाटप करण्यात आले आहे.

Strong performance of Jamkhed Revenue Department Distributed free Satbara transcripts to 6280 account holders in a single day.

सदर मोफत 7/12 वाटप हे घरोघरी केले जाणार आहेत. पुढील कालावधीमध्येही ही मोहिम सुरू राहणार असून सर्व खातेदारांना निशुल्क 7/12 वाटप होणार आहे.

विशेष म्हणजे ज्या खातेदारांची ऑनलाइन पीक पाहणी झालेली आहे त्यांना अद्ययावत पीक पाहणी सहीत 7/12 मिळाला आहे.

Strong performance of Jamkhed Revenue Department Distributed free Satbara transcripts to 6280 account holders in a single day.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम जामखेड तालुक्यात राबवण्यात येत आहे अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

 

web titel : Revenue Department | Strong performance of Jamkhed Revenue Department Distributed free Satbara transcripts to 6280 account holders in a single day.