- Advertisement -

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने पटकावला महाराष्ट्र केसरी 2022 चा मान

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील या मल्लाने बाजी मारत यंदाच्या महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरले. (Prithviraj Patil from Kolhapur won Maharashtra Kesari 2022)

महाराष्ट्र केसरी 2022 स्पर्धेची अंतिम लढत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील विरूध्द मुंबई पुर्वचा विशाल पाटील या दोन मल्लांमध्ये झाली. साताऱ्यात पार पडलेल्या या सामन्यात अतिशय चुरशीची लढत पार पडली. सुरूवातीपासून पिछाडीवर असलेल्या पृथ्वीराजने शेवटच्या काही सेकंदात बाजी पलटवली. 5-4 च्या फरकाने पृथ्वीराज महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला.

पहिल्या फेरीत विशाल बनकर याने 4-0 अशी आघाडी घेतली होती, गादी आणि माती गटाचे सामने रंगतदार ठरले. माती गटात विशाल बनकर तर गादी गटात पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीचे दावेदार ठरले.

पृथ्वीराज व विशाल यांच्यात उत्कंठावर्धक सामन्यात पृथ्वीरीजने बाजी मारली. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित 64 वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली.