अजिनाथ हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळ्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । चैत्र एकादशी आणि ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळ्यात विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जवळा आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन युवक कार्यकर्ते अरविंद हजारे यांनी केले आहे. (Organizing various programs on the occasion of Ajinath Hajare’s birthday)

जामखेड तालुक्याच्या अर्थकारणात ‘क्रांती’ घडवून आणत गोरगरिबांचे आयुष्य उभे करणारे ज्योती क्रांतीचे संस्थापक अजिनाथ (नाना) हजारे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हजारे समर्थकांकडून जवळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी चैत्र एकादशीचा मुहूर्त साधण्यात आला आहे.

चैत्र एकादशी आणि ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळ्यात 11 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजता भजनसंध्या आयोजित करण्यात आली आहे. भजनसंध्या कार्यक्रमासाठी अहमदनगर येथील कलाकार येणार आहेत.

तसेच महाराष्ट्रात गाजत असलेल्या सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार हभप शिवलिलाताई पाटील यांचे 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन जवळेश्वर मंदिरासमोर करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळा आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन युवक कार्यकर्ते अरविंद हजारे यांनी केले आहे.