- Advertisement -

Gunratna Sadavarte | ॲड गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या ॲड गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर एस टी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Adv. Gunaratna Sadavarten remanded in police custody)

शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर हिंसक जमावाने हल्ला केला होता. हिंसक जमावाने पवार यांच्या घरासमोर दगडफेक, चप्पलफेक केली होती. तसेच जय श्रीराम, शरद पवार मुर्दाबाद, अजित पवार मुर्दाबाद अश्या घोषणा दिल्या होत्या, तसेच अतिशय अर्वाच्च भाषेत जमावाकडून शिविगाळ केली जात होती.

पवार यांच्या निवासस्थानी ज्या जमावाने हल्ला घडवून आणला त्यातील काही जण मद्यधुंद अवस्थेत होते, तसेच काहींना पुण्यातून भाड्याने आणण्यात आले होते. या प्रकरणात तब्बल 105 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात एस टी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. रात्रीच त्यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली होती.

आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच 109 एस टी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही सुनावणी किला कोर्टात पार पडली. न्यायाधीश कैलास सावंत यांच्या समोर ही सुनावणी पार पडली.