अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप, अवघ्या पाच महिन्यात कोर्टाने सुनावणी शिक्षा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अवघ्या पाच महिन्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा ऐतिहासिक फैसला श्रीगोंदा जिल्हा कोर्टाने दिला आहे. या प्रकरणातील आरोपी हा कर्जत तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात बलात्कार ,लैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल कण्यात आले होते. (Man sentenced to life imprisonment for abusing a minor girl)

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. दि ६ ऑगस्ट रोजी एका विशिष्ट समाजातील अल्पवयीन मुलगी ही शेळ्या चारण्यासाठी रानात गेली असता तेथे आरोपी मोहन जयसिंग निंबाळकर वय-५५ (रा. पाटेवाडी ता. कर्जत) याने सदर पिडीत अल्पवयीन मुलीस पैशाचे आमिष दाखवून तिच्या शेळ्या तो राहत असलेल्या भाडयाचे राहते घरासमोर बाभळीच्या झाडास बांधून तिला आपल्या राहत्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

सदर प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास तुझ्या आई बापाला मारून टाकून अशी धमकी दिली. सदर मुलीवर ६ ऑगस्ट पूर्वी दहा ते बारा दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार केला होता. ६ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीच्या बहिणीने ही घटना पाहून तिच्या आईला सांगितल्याने त्यानंतर पिडीत मुलीची आई ही पिडीत मुलीस घेवुन कर्जत पोलिस ठाण्यात आली असता पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व महिला पोलीस नाईक जयश्री गायकवाड यांनी सदर घटनेबाबत अल्पवयीन मुलीकडे प्राथमिक चौकशी केली असता पीडित मुलीवर अत्याचार झालेल्या गुन्ह्याची उकल झाली.

अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात बलात्कार,बाल लैंगिक अत्याचार ,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमे असल्याने गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. उपअधीक्षक जाधव यांनी तपास हाती घेताच सदर गुन्ह्यातील आरोपी चा पोलीस स्टाफ मदतीने तात्काळ शोध घेऊन २४ तासाचे आत आरोपी गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे गुन्ह्याचा सखोल तपास करून ६० दिवसात गुणात्मक दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालय श्रीगोंदा यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

सदरचा खटला न्यायालयात जलद गतीने चालून सदर खटला दि. ३१ रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीम शेख यांनी आरोपी नामे मोहन जयसिंग निंबाळकर (पाटेवाडी ता.कर्जत) यास बलात्कार, बाललैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमानुसार जन्मठेप व पाच हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून जी. के.मुसळे, कोर्ट पैरवी अंमलदार एन. एस. दरेकर यांनी उत्तमरित्या काम पाहिले. तसेच मूळ फिर्यादी तर्फे ॲड सुमित पाटील यांनी कामकाज पाहिले. पोलीस अंमलदार संतोष धांडे ,संतोष साबळे यांनी तपासकामी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना सहकार्य केले.