आमदार रोहित पवार गरजले : भगवान श्रीराम सगळ्यांचे; कुण्या एकट्याची मक्तेदारी नव्हे !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जे जे लोक चांगलं काम करतात, चांगल्या वृत्तीने वागतात, त्या सगळ्यांच्या मनामध्ये श्रीराम आहे. त्यामुळे भगवान श्रीराम हे सगळ्यांचेच आहेेत, कुण्या एकट्याची मक्तेदारी नाही, असे सांगत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Lord Shriram belongs to everyone, not the monopoly of a few - MLA Rohit Pawar, Kharda ravan dahan sohla 2022,

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा (शिवपट्टन) किल्ला मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रावण दहन सोहळ्याचे 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, रामायण मालिकेतील कलाकार अरूण गोविल, दीपिका चिखलिया, सुनिल लहरी, क्रिकेटपट्टू केदार जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रविणदादा गायकवाड, शाहीर कांबळे सह आदी प्रमुख मान्यवर तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Lord Shriram belongs to everyone, not the monopoly of a few - MLA Rohit Pawar, Kharda ravan dahan sohla 2022,

यावेळी पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते बसलेले आहेत, ते ज्या लोकांसाठी काम करतात त्यांच्या मनामध्ये श्रीराम आहे. हे जे पुढचे मान्यवर बसले आहे,त ते ज्या समाजासाठी काम करतात यांच्या मनामध्येही श्रीराम आहे. तुम्ही सर्वजण सुद्धा जेव्हा समाजामध्ये चांगले काम करत असता तेव्हा तुमच्या मनामध्ये श्रीराम आहे.त्यामुळे जे जे लोक चांगलं काम करतात, चांगल्या वृत्तीने वागतात, त्या सगळ्यांच्या मनात श्रीराम आहे. त्यामुळे भगवान श्रीराम हे सगळ्यांचेच आहेेत, कुण्या एकट्याची मक्तेदारी नाही, अशी गर्जना यावेळी पवार यांनी केली.

Lord Shriram belongs to everyone, not the monopoly of a few - MLA Rohit Pawar, Kharda ravan dahan sohla 2022,

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे असलेल्या शिवपट्टन किल्ल्यासमोर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गतवर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर जगातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाची उभारणी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील आजवरच्या सर्वात उंच म्हणजेच ७५ फुटी रावणाच्या प्रतीकृतीचे दहन स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने खर्डा किल्ल्यासमोर केले. या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सन्माननीय व्यक्तींसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.

Lord Shriram belongs to everyone, not the monopoly of a few - MLA Rohit Pawar, Kharda ravan dahan sohla 2022,

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी धनुष्यबाण सोडून सध्या महाराष्ट्रासह अखंड देशाला भेडसावत असलेल्या १० महत्त्वाच्या समस्या असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले. या समस्या म्हणजेच महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता व दारिद्रय. या होय. यासोबतच यावेळी आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही अनेक समस्या लिहून दिल्या आणि त्यांचे देखील यावेळी दहन करण्यात आले.

Lord Shriram belongs to everyone, not the monopoly of a few - MLA Rohit Pawar, Kharda ravan dahan sohla 2022,

उपस्थित मान्यवरांनी बाण सोडून रावण दहन केल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. तसेच या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. अशाप्रकारे राज्यात एक नवा विक्रम आ. रोहित पवार यांनी रचला असल्याचं या माध्यमातून पाहायला मिळालं.

Lord Shriram belongs to everyone, not the monopoly of a few - MLA Rohit Pawar, Kharda ravan dahan sohla 2022,

पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठा रावण दहन सोहळा ⤵️