Mirajgaon Land Grab Case मिरजगाव जमीन हडप प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीस कर्जत पोलिसांनी ठोकल्या बेड्या | Karjat police arrested fugitive accused in land grab case

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | १८ जाने जानेवारी | बनावट महिला उभी करून मिरजगाव येथील शेतजमीन विक्री प्रकरणातील पुण्यातील फरार आरोपीस अखेर कर्जत पोलिसांनी जेरबंद केले. सदरचा आरोपी दोन वर्षांपासून फरार होता. या धोकाधडीमध्ये आंबीजळगाव येथील विद्यमान लोकानियुक्त सरपंचाचा समावेश असल्याने सदरील प्रकरण कर्जत तालुक्यासह जिल्हयात गाजले होते. (Karjat police arrested fugitive accused in Mirajgaon land grab case)

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजगाव येथील फिर्यादी निर्मला हिराचंद गांधी यांची शेत गटनं. ६६/२ मधील २ हेक्टर १८ पैकी २० गुंठे शेतजमीन स्वताच्या आर्थीक फायदयाकरीता बनावट महिला उभी करून यासह बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवत वरील २० गुंठ्याची बनावट खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यात आला होता. सदर खरेदी करताना बनावट असल्याचे माहित असतांना सुद्धा आर्थीक फायदयासाठी फिर्यादीची फसवणूक करण्यात आली होती. (Karjat police arrested fugitive accused in Mirajgaon land grab case)

याबाबत फिर्यादी निर्मला गांधी यांनी कर्जत पोलीस ठाण्यात ३० जाने २०२० रोजी रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये आरोपी नामे १) ज्ञानेश्वर शेषराव मोहिते – वय ४१ वर्षे, मुळ रा. गोसेगाव, ता. भोकरदन, जि. जालना हल्ली रा. कसलीवाल आपुर्वा अपार्टमेंट ऐअरपोर्ट समोर चिकलठाणा औरंगाबाद २) प्रफ्फुल नेमिचंद ताथेड – वय ५९ रा.वडगाव कोल्हारी, बजाजनगर, औरंगाबाद, ३) पुरुषोत्तम बाबुराव उर्फ बापुराव कुरूमकर – वय ४० वर्षे, रा.लिपणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ४) विनायक उर्फ सचिन वामन चौधरी – वय ३७ वर्षे, रा. घारगांव, ता. श्रीगोंदा, अहमदनगर ५) राजेंद्र भागुजी शेडगे – रा. ३०२ प्रथमेस अपार्टमेंट शिवने, ता. हवेली, जि. पुणे

६) रविंद्र श्रीराम जाधव – रा.बेगमपुरा औरंगाबाद, जि. औरंगाबाद ७) महेमुदा बशिर शेख – वय ७० वर्षे, रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर ८) विलास उर्फ (आप्पा) भिवा निकत – वय ४५ वर्षे, मुळ रा. अंबिजळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर, ९) वंदना राजेंद्र अल्हाट – वय ३६ वर्षे, रा. बोल्हेगाव, ता. नगर, जि. अहमदनगर, मुळ रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, १०) अन्सार मुनीर शेख – वय २९ वर्षे, रा. महादेववाडी, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर, हल्ली मुक्काम कोथिंबिरे मळा, साळणदेवी रोड श्रीगोंदा, जि. अहमदनगर, ११) बापु बलभिम निंभोरे उर्फ (मेजर) – वय ३६ वर्षे, रा. घोटवी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांनी कट करुन संगनमताने आपली शेतजमीन हडपली असल्याचे नमूद केले होते.

यामधील आरोपी क्रमांक ५ राजेंद्र भागुजी शेडगे – रा. ३०२ प्रथमेस अपार्टमेंट शिवने, ता. हवेली, जि. पुणे हा दि. ३० डिसेंबर २०२० रोजी गुन्हा घडल्यापासून अद्दाप पावेतो फरार राहुन स्वतःचे अस्तित्व लपवत होता. दि ७ जाने २०२२ रोजी शेंडगे त्यांच्या राहते घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस सूत्रांना मिळाली होती. सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे येथे जावुन उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या मदतीने मोठ्या शिताफिने आरोपीस ताब्यात घेत अटक केले.

सदर आरोपीस पोलीस कोठडी मिळाली असून सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि एस एच गावीत, पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, गोवर्धन कदम यांनी पार पाडली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोसई भगवान शिरसाठ आणि रायटर पोलीस अंमलदार पोकॉ ईश्वर माने, पोकॉ अमित बरडे करीत आहे