जामखेडमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुका माजी सैनिक संघटना आजी-माजी सैनिक व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अ.नगर च्या वतीने जामखेडमध्ये कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एनसीसीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले.

कारगिल युद्धात भारतीय सैन्याने सर्वोच्च पराक्रम दाखवत दैदीप्यमान विजय मिळवला होता, याच विजयाची आठवण म्हणून दरवर्षी 26 जूलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या विजयासाठी ज्या शुरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या जवानांना मानवंदना दिली जाते.

आज जामखेड शहरात जामखेड तालुका माजी सैनिक संघटना आजी-माजी सैनिक व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अ.नगर, जामखेड तहसील कार्यालय, जामखेेड पोलीस विभाग, जामखेड नगरपरिषद ,कृषी विभाग आणि ग्रामस्थ यांच्या वतीने जामखेड शहरातील शहीद सैनिक स्मारक या ठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा करत शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली.

तत्पूर्वी 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी रॅलीचे तहसीलदार योगेश चंद्रे व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कारगिल विजय दिनाचा विजय असो, जय जवान जय किसान, भारतीय सेनेचा विजय असो ,भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी संपूर्ण जामखेड शहर दणाणून गेले होते. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित रॅलीचे समस्त जामखेडकरांनी स्वागत केले.रॅलीमध्ये जामखेड महाविद्यालय जामखेड, ल.ना. होशिंग विद्यालय, नागेश विद्यालयाचे एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते.कारगिल विजय दिवस अतिशय उत्साहात संपन्न करण्यात आला.

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे तहसीलदार, योगेश चंद्रे हे होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ ,कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर , शहीद गणेश भोसले यांचे माता- पिता कृष्णाजी भोसले व शोभा भोसले, प्राचार्य श्रीकांत होशीग, प्राचार्य नरके, प्राचार्य मडके  बी के, नगरसेवक अमित चिंतामणी, शरद कार्ले,  मंगेश आजबे, माजी सैनिक संघटना संस्थापक बजरंग डोके, अध्यक्ष दिनकर भोरे, उपाध्यक्ष नानासाहेब बाबर, कार्याध्यक्ष रावसाहेब जाधव, सचिव अंकुश जगदाळे,

खजिनदार शिवाजी साळवे, एनसीसी ऑफिसर गौतम केळकर, अनिल देडे, मयूर भोसले, अंगद कोल्हे, सुभाष ढगे अरविंद जाधव, योगेश कोल्हे, संतोष कदम, शिवाजीराव चव्हाण ,शिवाजी गाडेकर, धर्माधिकारी, काशिनाथ पवार, कचरू घोडके, अरुण अडाले, दनाने मेजर, सुखदेव शिंदे, कार्ले मेजर,पवन राळेभात, लहुराज पवार , प्रा दादा ठाकरे, शिंदे बी एस ,विजू शेठ कोठारी, हज्जूभाई सुभेदार, ग्रामस्थ व्यापारी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.