जामखेड : भाजपच्या जामखेड तालुकाध्यक्ष पदासाठी 17 जण इच्छूक, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : BJP Maharashtra: भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बांधणी वेगाने हाती घेतली आहे. काही दिवसांपुर्वी पक्षाने राज्यातील जिल्हाध्यक्ष पदांच्या निवडी जाहीर केल्या होत्या. त्यामुळे तालुका निहाय नव्या तालुकाध्यक्षांच्या निवडी कधी जाहीर होणार याकडे भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. अखेर भाजपने तालुकाध्यक्ष पदासाठीच्या मुलाखती शनिवारी घेतल्या. (BJP News Maharashtra)

Jamkhed,17 aspirants for the post of BJP's Jamkhed taluka president, regional vice president Madhav Bhandari interviewed the aspirants, bjp news maharashtra,

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा प्रभारी माधव भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर दक्षिणेतील सात तालुक्यांच्या तालुकाध्यक्षपदांसाठीच्या मुलाखती शनिवारी नगर तालुक्यातील वाळकी येथे संपन्न झाल्या. यामध्ये कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, नगर पारनेर या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या मुलाखतींसाठी जामखेड तालुक्यातील 17 पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी तालुकाध्यक्ष पदासाठी पक्षाकडे मुलाखती दिल्या. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, प्रदेश चिटणीस अरुण मुंडे, जिल्हा अध्यक्ष दिलीप भालशिंग हेही उपस्थित होते.

विद्यमान तालुकाध्यक्ष अजय (दादा) काशिद हे मागील तीन वर्षांपासून तालुकाध्यक्ष म्हणून पक्षात कार्यरत होते. नव्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत अजय (दादा) काशिद हेही पुन्हा तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छूक आहेत.

विद्यमान तालुकाध्यक्ष अजय (दादा )काशिद यांच्याशिवाय जिल्हा सरचिटणीस पांडूरंग उबाळे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, पंचायत समिती सदस्य डाॅ भगवान मुरूमकर, बापुराव ढवळे, ज्योति क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, डाॅ ज्ञानेश्वर झेंडे, नानासाहेब गोपळघरे, बापू माने, भाजपा सोशल मिडीया प्रमुख, उद्धव हुलगुंडे, ॲड प्रविण सानप, केशव वनवे, राहूल चोरगे, प्रविण बोलभट, विष्णू गंभीरे हेही तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छूक आहेत. या सर्वांनी तालुकाध्यक्ष पदासाठी पक्षाकडे आज मुलाखती दिल्या.

जामखेड भाजपच्या तालुकाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे संघटनेत काम करण्यास इच्छूक असलेले कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. लवकरच जामखेड भाजपला नवा तालुकाध्यक्ष मिळणार आहे. तालुकाध्यक्ष निवडताना आमदार प्रा.राम शिंदे यांचा आशीर्वाद महत्वाचा ठरणार आहे. आमदार प्रा राम शिंदे हे कोणाला आशीर्वाद देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.