Jamkhed Nagar Parishad election 2022 | अखेेर जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, जाणून घ्या संपुर्ण निवडणूक कार्यक्रम !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर आज निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेले इच्छुक उमेदवार निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने पुन्हा ऍक्टिव्ह होताना दिसणार आहेत.

राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायती यांच्या निवडणूक कार्यक्रमांची आज घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षणाविना या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे.

जामखेड नगरपरिषदेच्या 12 प्रभागांसाठीची आरक्षण सोडत काही दिवसांपुर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याचीच उत्सुकता इच्छुक उमेदवारांना होती, मात्र सरकार बदलल्यानंतर निवडणूक कार्यक्रमांमध्ये काही बदल होईल की काय याचीच धाकधुुक अनेकांना लागली होती, प्रभाकर रचना रद्द करावी, अशी मागणी भाजपने केली होती, मात्र या मागणीला निवडणुक आयोगाने धुडकावून लावत आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे

उमेदवारी अर्ज भरणे : 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 02 या कालावधीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज वेबसाईटवर भरता येतील.

उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत : 22 ते 28 जुलै या कालावधीतच सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार.

अर्ज छाननी : 29 जुलै रोजी अर्जांची छाननी होवून वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 8 ऑगस्ट 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत

निवडणूक चिन्ह वाटप : 8 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूक चिन्ह नेमून देत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

मतदान : 18 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान

मतमोजणी : 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे.

जामखेड नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण खालील प्रमाणे

  • प्रभाग 1 अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण,
  • प्रभाग 2 अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण,
  • प्रभाग 3 अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण,
  • प्रभाग 4 अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण,
  • प्रभाग 5 अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण) ब) सर्वसाधारण महिला
  • प्रभाग 6 अ) अनुसूचित जाती महिला ब) सर्वसाधारण,
  • प्रभाग 7 अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण,
  • प्रभाग 8 अ) अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) ब) सर्वसाधारण महिला
  • प्रभाग 9 अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
  • प्रभाग 10 अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
  • प्रभाग 11 अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
  • प्रभाग 12 अ) अनुसूचित जाती ब) सर्वसाधारण