जामखेड: आमदार रोहित पवारांची शेतकऱ्यांप्रती असलेली असंवेदनशीलता आली समोर, बसा तिकडेच म्हणत रोहित पवार दुसर्‍या गाडीत बसून भुर्र, घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर झाला वायरल, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । रस्त्याच्या प्रश्नांवरून शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांची गाडी आडवली. निवेदन न स्विकारता, शेतकऱ्यांशी कोणताही संवाद न करता रोहित पवार थेट दुसर्‍या गाडीत बसून गेल्याचा धक्कादायक प्रकार जामखेड तालुक्यातून समोर आला. ही घटना खर्डा येथे आज सायंकाळी घडली. या घटनेतून आमदार रोहित पवार यांची शेतकऱ्यांविषयी असलेली असंवेदनशीलता समोर आली आहे. रोहित पवारांच्या या कृतीमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

Jamkhed, MLA Rohit Pawar's insensitivity towards farmers came to the fore, Rohit Pawar sitting in another car saying sit down, the video of the incident went viral on social media, what exactly happened? Read in detail

याबाबत सविस्तर असे की, आमदार रोहित पवार हे आज जामखेड तालुक्याच्या दौर्‍यावर होते. या दौऱ्यात त्यांनी विविध गावांना भेटी दिल्या. सायंकाळी ते खर्डा भागाच्या दौर्‍यावर होते. खर्डा – जुना वाकी रस्त्याच्या प्रश्नावरून या भागातील शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांची गाडी आडवली. यावेळी शेतकऱ्यांनी जुन्या वाकी रस्त्याच्या संदर्भात पवार यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता आमदार रोहित पवार यांनी निवेदन स्वीकारले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांची गाडी आडवली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने पवार यांच्या गाडीसमोर ठाण मांडून बसले होते.आमदार रोहित पवार यांनी संबंधित शेतकऱ्यांची कैफियत ऐकुन काही तरी तोडगा काढण्याऐवजी ते तडक आपल्या गाडीतून खाली उतरले. जाता जाता शेतकऱ्यांना म्हणाले की, बसा तिथेच असे म्हणत दुसर्‍या गाडीत जाऊन बसले. रोहित पवार हे दुसर्‍या गाडीत जाऊन बसत असताना राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व कार्यकर्ते ओ दादा ओ दादा अशी हाक मारत होते परंतू  रोहित पवारांनी कोणाचेच काहीएक न एकता तेथून काढता पाय घेतला.

Jamkhed, MLA Rohit Pawar's insensitivity towards farmers came to the fore, Rohit Pawar sitting in another car saying sit down, the video of the incident went viral on social media, what exactly happened? Read in detail
गाडीसमोर बसलेल्या शेतकऱ्यांशी कोणतीच चर्चा न करता आपल्या गाडीतून उतरत दुसर्‍या गाडीत बसण्यासाठी निघालेले आमदार रोहित पवार

दरम्यान, आमदार रोहित पवारांना निवेदन देण्याचा प्रयत्न करणारे सर्व शेतकरी खर्डा भागातील होते. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या खर्डा सेवा सोसायटीचे तीन संचालकांचाही समावेश होता. तर एका माजी चेअरमनचा समावेश आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वाऱ्यासारखा वायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर शेतकरी वर्गातून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या त्या कृतिविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Jamkhed, MLA Rohit Pawar's insensitivity towards farmers came to the fore, Rohit Pawar sitting in another car saying sit down, the video of the incident went viral on social media, what exactly happened? Read in detail
दुसर्‍या गाडीत बसून जाण्यासाठी निघालेले आमदार रोहित पवार

बघा हा मोठ्या घरच्या लेकराचा माज – भाजपा नेते रविंद्र सुरवसे

भाजपचे नेते रविंद्र सुरवसे यांनी खर्डा येथे घडलेल्या सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. बघा हा मोठ्या घरच्या लेकराचा माज अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.आम्ही इतकी वर्षे झाले राष्ट्रवादीला मत देतोय आणि त्या राष्ट्रवादीच्या आमदाराला आमच्याकडे बघायला वेळ नाही, चालताना ते म्हणतात की बसा तिकडेचं, आता त्या आमदारांकडे बघायची वेळ आली आहे, अश्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार निघून गेल्यानंतर व्यक्त केल्या,अशी माहिती भाजपचे नेते रविंद्र सुरवसे यांनी यावेळी बोलताना दिली.

रस्त्याच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांनी गाडी आडवली – सुनिल लोंढे

सदर अंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे हेही सहभागी होते. यावेळी झालेल्या प्रकाराबाबत बोलताना लोंढे म्हणाले की,जुना वाकी रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी अनेकदा आमदार रोहित पवार यांना निवेदन दिले आहेत. तीन वर्षांपासून ते करतो बघतो असे अश्वासन शेतकऱ्यांना देत होते. पण काम मार्गी न लागल्याने आज लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला.आम्हाला त्यांच्याकडून थोडी उड्डाण पुल हवा होता किंवा बुलेट ट्रेन हवी होती. शेतकऱ्यांच्या छोट्या मागण्या असतात, त्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे होते, पण तसे घडले नाही. ते (रोहित पवार) काय आमचे दुश्मन नाहीत, आमच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची गाडी आडवून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला.पण त्यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकुन घेतलं नाही, असे सुनिल लोंढे म्हणाले.

Jamkhed, MLA Rohit Pawar's insensitivity towards farmers came to the fore, Rohit Pawar sitting in another car saying sit down, the video of the incident went viral on social media, what exactly happened? Read in detail
आमदार रोहित पवार यांच्या गाडीसमोर बसलेले शेतकरी

शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय होती ?

खर्डा ते जुना वाकी हा तीन चार किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार झाल्यापासून सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा याबाबत या भागातील शेतकरी वेळोवेळी त्यांना निवेदन देत होते. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अश्वासन दिले जात होते.पावसाळा तोंडावर आलेला असताना सदर रस्त्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खर्डा येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार रोहित पवारांची गाडी आडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार रोहित पवार यांनी निवेदन न घेता, शेतकऱ्यांशी संवाद न साधता, थेट दुसर्‍या गाडीत बसून जाण्याचा प्रताप केला. या सर्व प्रकारामुळे आमदार रोहित पवारांविषयी शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

खर्डा येथील घटनेचा व्हिडीओ