Punyashlok Ahilya Devi Holkar Agricultural College Halgaon : अखेर प्रतिक्षा संपली, हळगावमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय कार्यान्वित, महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन कॅबिनेट मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत जामखेड तालुक्यासाठी कृषि महाविद्यालय मंजुर करून आणले होते.गेल्या तीन वर्षांत सदर महाविद्यालयाचे काम सुरू होते. आमदार प्रा.राम शिंदे यांनी मंजुर करून आणलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय (Punyashlok Ahilya Devi Holkar Agricultural College Halgaon) 1 मे 2023 पासुन हळगावच्या कॅम्पसमध्ये कार्यान्वित झाले आहे. 1 मे रोजी हळगावच्या कृषि महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Jamkhed, finally the wait is over, Punyashlok Ahilyadevi Holkar Agricultural College is operational in Halgaon, Maharashtra Day is celebrated with enthusiasm in the college

महात्मा फुले कृषि विद्यापीठाशी संलग्न असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय (Punyashlok Ahilya Devi Holkar Agricultural College, Halgaon) आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर कार्यान्वित झाले आहे.जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये महाविद्यालय कधी सुरू होणार ? याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. हळगाव कृषि महाविद्यालय आज 1 मे 2023 रोजी कार्यान्वित करण्यात आले आहे. हळगावच्या कॅम्पसमध्ये सर्व शिक्षक आणि विद्यार्थी दाखल झाले आहेत.

Jamkhed, finally the wait is over, Punyashlok Ahilyadevi Holkar Agricultural College is operational in Halgaon, Maharashtra Day is celebrated with enthusiasm in the college

हळगाव कृषि महाविद्यालयात सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत 63 वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना डॉ. ससाणे यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाचे महत्व समजावून सांगितले.हळगाव कॅम्पसमध्ये दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी स्वच्छता मोहिम राबवली.

Jamkhed, finally the wait is over, Punyashlok Ahilyadevi Holkar Agricultural College is operational in Halgaon, Maharashtra Day is celebrated with enthusiasm in the college

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चारूदत्त चौधरी, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे,  शारीरिक शिक्षण निदेशक डॉ. राहुल विधाते यांनी विशेष मेहनत घेतली. कृषि महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Jamkhed, finally the wait is over, Punyashlok Ahilyadevi Holkar Agricultural College is operational in Halgaon, Maharashtra Day is celebrated with enthusiasm in the college

दरम्यान, हळगावच्या कृषि महाविद्यालयात आता दररोज नियमित वर्ग भरले जाणार आहेत. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक दाखल झाले आहेत. सर्वांची राहण्याची व्यवस्था महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये करण्यात आली आहे. महाविद्यालय सूरू झाल्यामुळे हळगाव परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लवकर या महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास आल्याने सर्वत्र समाधानाचे अन आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.