जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Godad Maharaj karjat | कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराजांच्या हस्तलिखित ग्रंथांचे जतन करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून गोदड महाराजांनी लिहिलेल्या हस्तलिखित ग्रंथांचे जतन करण्यात येणार आहे.
गोदड महाराजांनी लिहिलेला ‘जगतारक’ हा पहिला हस्तलिखित ग्रंथ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या ‘कला संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षण विभागा’कडं सुपूर्द करण्यात आला आहे.
कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांची हस्तलिखित स्वरूपात विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. संत गोदड महाराजांच्या विचारांवर लोकांची आस्था, प्रेम आणि विश्वास असल्याने या ग्रंथसंपदेचं जतन करुन ती लोकांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे असे आमदार रोहित पवार म्हणाले.
संत गोदड महाराजांनी लिहिलेल्या हस्तलिखित ग्रंथांचे संवर्धन व्हावे यासाठी संत गोदड महाराज मंदिराचे मानकरी, नागरीक आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचं मोठं सहकार्य लाभत आहे.
कर्जतचं ग्रामदैवत असलेल्या सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांची हस्तलिखित स्वरूपात विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. संत गोदड महाराजांच्या विचारांवर लोकांची आस्था, प्रेम आणि विश्वास असल्याने या ग्रंथसंपदेचं जतन करुन ती लोकांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. pic.twitter.com/6Q2zA2atnq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 24, 2021