अहमदनगर Crime News : अहमदनगर जिल्हा एका धक्कादायक घटनेने हादरला आहे. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीचा मृतदेह तिच्याच घरात घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.(Death of 10th standard girl in Parner Suspicion of rape and murder Ahmednagar district trembled)
तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना पारनेर parner तालुक्यातून समोर आली आहे.
मुलगी एकटीच घरी असताना हा प्रकार घडला असून ही विद्यार्थीनी पारनेर तालुक्यातील जवळे येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकत होती.
बुधवारी सकाळी मुलीचे पालक नेहमीप्रमाणे शेतात मजुरीसाठीर गेले होते. तर तिचा भाऊ शाळेत गेला होता.
मुलगी एकटीच घरी होती. दुपारी शाळेतून घरी आलेल्या मुलीच्या भावाने घरात प्रवेश करताच त्याला धक्का बसला.
त्याची बहीण घरातील कॉटवर रक्ताच्या थाराेळ्यात आढळली. हा प्रकार पाहून भयभीत झालेल्या भावाने मोठमोठ्याने हंबरडा फोडला.
त्याच्या आवाजाने शेजारी राहणारे नागरिक तेथे आले. त्यांनी त्या मुलीला तत्काळ उपचारासाठी जवळे येथील दवाखान्यात नेले.
दरम्यान तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले.
तरुणीवर अत्याचार करुन तिच्या तोंडात बोळा कोंबून खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.
ही तरुणी घरात एकटीच असताना हा प्रकार घडल्याच समोर आलंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जातेय.
शवविच्छेदनासाठी मृतदेह अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
या प्रकरणांत पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.