Gold Silver Price Today 21 October 2021 | सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये गुरूवारी मोठी वाढ तर पेट्रोल-डिझेल दरवाढीचाही उडाला भडका, जनता झाली हैराण

दिवाळीत सोनं महागणार तज्ज्ञांचा अंदाज

मुंबई Gold Silver Price Today 21 October 2021 |: सण-उत्सवाच्या काळात सोनं खरेदीकडे लोक वळतात.महिला वर्गाचा विशेष कल असतो.गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार सुरू आहे. यामुळे सोने खरेदीकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कल वाढला आहे. आता दिवाळी सणासाठी सोने चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यापूर्वीच सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये गुरूवारी मोठी वाढ झाली आहे.

आधीच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेला आहे. त्यात सोनं आणि चांदीच्या दरवाढीची भर पडली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात आज 0.43 टक्के वाढ झाली आहे. MCX नुसार, गरुवारी सोन्याच्या दरांत 164 रुपयांनी वाढ होऊन प्रतितोळा 47 हजार 548 इतकं झालं आहे.

अमेझाॅन ग्रेट इंडियन फेस्टिवल : फायदेशीर ऑफरमध्ये आवडती वस्तू खरेदी करा

गुरुवारी सोनं आणि चांदीच्या दरांत (Gold Silver Price Today) वाढ पाहायला मिळाली. बुधवारी बाजार बंद होण्यापूर्वी सोन्याची किंमत प्रतितोळा 47 हजार 548 रुपये इतकी झाली होती. याशिवाय चांदी प्रति किलो 65,607 रुपये इतकी झाली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोनं 0.1 टक्केंनी घसरुन 1,800 डॉलर प्रति औंस झालं आहे.

दिवाळीत सोनं महागणार?

मार्केट तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, दिवाळीपासून डिसेंबरपर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळू शकते. यावेळी सोनं प्रतितोळा 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतं. याचवेळी चांदीची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढू शकते. या कालावधीत चांदी प्रति किलो 76,000 ते 82,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा उडाला भडका

Petrol-diesel price hike erupts सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज डिझेलच्या किमतींमध्ये 33 ते 37 पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर पेट्रोलच्या दरांमध्ये 30 ते 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत 106.54 रुपये, तर डिझेलचे दर 95.27 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 112.44 रुपये आणि डिझेलची किंमत 103.26 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 107.11 रुपये, तर डिझेलचे दर 98.38 रुपये लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 103.61 रुपये लिटर आहे. तर डिझेल 99.59 रुपये लिटरनं विकण्यात येत आहे.

 

web titel : Gold Silver Price Today | Gold Silver Price Today 21 October 2021rose sharply on Thursday Petrol diesel price hike erupts