अहमदनगर जिल्ह्यात सात ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्र सुरू, १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । खरीप हंगामामधील भरडधान्य खरेदीसाठी अहमदनगर जिल्ह्यात ७ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशनचे जिल्हा विपणन अधिकारी श्रीकांत आभाळे यांनी केले आहे.

coarse grain purchase centers open at seven places in Ahmednagar district, appeal to farmers to register by October 15

मका १९६२ रूपये व बाजरी २३५० रूपये प्रति क्विंटल हमीभाव शासनाने निश्चित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सात केंद्राद्वारे भरडधान्य खरेदी केली जाणार आहे.

पहा LIVE राज्यातील सर्वात मोठा रावण दहन सोहळा

अहमदनगर जिल्ह्यातील भरडधान्य खरेदी केंद्र खालील प्रमाणे

 • तुळजा युमेन्स स्टेट लेव्हल को-ऑप सोसायटी (श्रीरामपूर),
 • श्रीराम बि-बियाणे उत्पादन व पणन प्रक्रिया सहकारी संस्था (साकत ता. नगर),
 • कृषी उत्पन्न बाजार समिती (कोपरगाव),
 • जय भगवान स्वयंरोजगार सह संस्था (पाथर्डी),
 • कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी (कर्जत),
 • सुखायु अँग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी (शेवगाव)
 • राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ (राहुरी)
 • ह्या संस्थांना भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणी व खरेदी केंद्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आणावीत

 1. चालू हंगामातील ऑनलाईन पीक पेरा नोंद असलेला सातबारा उतारा,
 2. आधारकार्ड प्रत,
 3. बॅंक खाते पासबुक प्रत,
 4. रद्द केलेला धनादेश प्रत,
 5. सध्याचा मोबाईल क्रमांक

कागदपत्रे नोंदणी केंद्रावर सादर करावीत. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. असेही आभाळे यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.