Audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore goes viral | ऑडिओ बाँम्बने राज्य हादरले : विरोधी पक्ष एकवटला तहसीलदार देवरेंच्या पाठीशी; निलेश लंके म्हणाले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पारनेरच्या डॅशिंग तहसिलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपने संपुर्ण राज्यात शुक्रवारी मोठी खळबळ उडवून दिली आहे. (Audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore goes viral) लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारणार आहोत असे या क्लिपमध्ये त्यांनी म्हटले आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप करत आत्महत्येचा इशारा दिलेल्या वायरल ऑडिओ क्लिपमध्ये (Audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore goes viral) देवरे यांनी आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून या क्लिपमध्ये निवेदन केले आहे.

महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो . लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात. आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठीशी घालतात.आपल्या विरुद्ध विधिमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीच्या चालकाकडून लिहून घेणे,अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल करण्याची धमकी देणे असे अनेक प्रकार घडले आहेत, असे देवरे यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. याबाबतचे निवेदन कथन करताना त्या अनेकदा रडतही आहेत. संपुर्ण क्लिपमध्ये त्यांनी कुणाचे नाव जरी घेतले तरी सर्व रोख हा आमदार निलेश लंके (Aamdar Nilesh Lanke parnre) यांच्या दिशेने जाणारा आहे. यामुळे याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत.

ऑडिओ क्लिप तहसीलदार देवरे यांचीच – जिल्हाधिकारी

शुक्रवारी सोशल मिडीयावर वायरल झालेली ऑडिओ क्लिप ही पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांंचीच असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी स्पष्ट केले आहे. देवरे यांनी या संदर्भात आठ दिवसांपूर्वी तक्रार केली असून त्याची महिला आयोगामार्फत चौैकशी सुरू आहे. या क्लिपवर काय धोरण घ्यायचे, हे प्रशासनाने अद्याप ठरवले नसल्याचे भोसले म्हणाले. (Audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore goes viral)

स्वत:वरील कारवाई टाळण्यासाठी देवरे यांचा बनाव – आमदार निलेश लंके

पारनेर तहसीलदारांनी ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या आरोपांबाबत आमदार निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तहसीलदारांच्या कारभाराबाबत अरुण आधळे हे उपोषणाला बसले होते. त्यानंतर प्रशासनाने केलेल्या चौकशीत तहसीलदारांच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत. याबाबतचा अहवाल मंत्रालयात गेलेला आहे. त्या अहवालामुळे आपणावर कारवाई होऊ शकते, या भीतीमुळे तहसीलदारांनी अशी ऑडिओ क्लिप बनवून आपल्या बचावाचा प्रयत्न केला आहे असे लंके म्हणाले. (Audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore goes viral)

भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचीच ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ म्हणतात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली आणि मन सुन्न झालं.सत्तेतले हे बेलगाम घोडे.. देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं असे चित्रा वाघ म्हणाल्या. (Audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore goes viral)

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ क्लिपची दखल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असुन या प्रकरणातील ते तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीत तातडीने या प्रकरणात लक्ष घालून तहसीलदार देवरे यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. (Audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore goes viral)