NMMS Scholarship result 2020-21 : अरण्येश्वर विद्यालयाची वनश्री मिसाळ जिल्ह्यात आठवी !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : एनएमएमएस शिष्यवृत्ती (nmms scholarship) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये अरणगावच्या अरण्येश्वर विद्यालयाची विद्यार्थ्यांनी वनश्री बाळू मिसाळ या विद्यार्थ्यांनीने १८० पैकी १५४ गुण मिळवून जिल्ह्यात आठवा क्रमांक पटकावला. (NMMS Scholarship result 2020-21)
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (nmms scholarship)जामखेड तालुक्यातील अरण्येश्वर महाविद्यालयाचे १९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये वनश्री मिसाळ व वैष्णवी यादव या दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत. या दोघींना शासनाकडून प्रत्येक ४८ हजाराची शिष्यवृत्ती मिळणार आहे. (NMMS Scholarship result 2020-21)
अरणेश्वर विद्यालयातील तन्वी जगताप (११४), स्वप्निल ढेपे (११२), शुभम ढेपे (१०५) निरंजन झिंझाडे (१०५) हे चार विद्यार्थी १०० पेक्षा जास्त गुणांनी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा nmms scholarship निकाल ९४.७४ टक्के लागला. विभागप्रमुख बी.एम चांगुणे, विषय शिक्षक एस.जी मोमीन, व्ही.पी निंबोरे, के.जी बिरंगळ, एस.एस शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य रमेश वराट, पर्यवेक्षक एच.एन कोल्हे ,सर्व शिक्षक तसेच स्थानिक स्कूल कमिटी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. (NMMS Scholarship result 2020-21)