आषाढी एकादशी 2023 : अहमदनगर जिल्ह्यातील वारकरी कुटूंबाला मिळाला शासकीय महापुजेचा मान

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात 20 लाखाहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत.पंढरपूर आषाढी एकादशी ( Ashadhi Ekadashi 2023) निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे (lata Shinde) यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. या पुजेवेळी शासकीय पूजेसाठी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील वारकरी कुटूंबाला मान मिळाला.

Ashadhi Ekadashi 2023, Warkari family of Ahmednagar district got  honor of Government Mahapuja in Pandharpur Vitthal Rukmini tempal, Bhausaheb kale, Mangal kale,

“बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे, असे साकडे विठूरायाच्या चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले.”

Ashadhi Ekadashi 2023, Warkari family of Ahmednagar district got  honor of Government Mahapuja in Pandharpur Vitthal Rukmini tempal, Bhausaheb kale, Mangal kale,

शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब काळे, मंगल काळे (जि.अहमदनगर) या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना एसटी महामंडळामार्फत देण्यात येणारा एक वर्ष मोफत प्रवासाचा पास प्रदान करण्यात आला.

Ashadhi Ekadashi 2023, Warkari family of Ahmednagar district got  honor of Government Mahapuja in Pandharpur Vitthal Rukmini tempal, Bhausaheb kale, Mangal kale,

आषाढीवारीमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी नगरोत्थानमधून १०८ कोटी व शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला. हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून भास्कर गिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करत आहे. देवगड ते पंढरपूर अशी पायी वारी हे काळे दापत्य करत आहे. भाऊसाहेब काळे हे व्यवसायाने शेती करतात. काळे दाम्पत्य हे आठ तास दर्शन रांगेत उभे होते.

आज आषाढी एकादशी आहे. यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तीत वारकरी तल्लीन झाले आहेत. चंद्रभागेच्या तिरावर विठुनामाचा, ज्ञानोबा तुकोबांचा गजर सुरु आहे.