अहमदनगर : जिल्हाधिकाऱ्यांचा फोन खणाणला अन् शासकीय यंत्रणा कामाला लागली, जिल्हाधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे 93 वर्षीय एकल महिलेला मिळाला न्याय, प्रशासनाचे होत आहे कौतूक !

अहमदनगर दि.३ ऑगस्ट  : समाजात अनेक गरजू व्यक्ती, एकल महिला, विधवा, अपंग, निराधार आहेत. या सर्वांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुकर होईल त्याचवेळी महसूल सप्ताह खऱ्या अर्थाने साजरा होईल, असे मत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर शहरातील एकल महिलेला मदत मिळवून देताना व्यक्त केले.

Ahmednagar, Collector's phone rang and government system started working, 93-year-old single woman got justice due to conscientiousness of Collector, administration is being appreciated,

दि. २ ऑगस्ट,२०२३, वेळ रात्री ११-०० वाजताची. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा मोबाईल खणाणतो आणि सावेडी परिसरातील आनंदनगर भागात ९३ वर्षाच्या छबुबाई चित्रा कदम या एकल महिला राहत असून त्यांना प्रशासनाकडून मदतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी वेळ न पाहता अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना पगारे (Archana Pagare) व संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विशाल नाईकवाडे (Vishal Naikwade) यांना फोन करून महिलेला तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेची अंमलबजावणी करत एकल महिलेशी दोन्ही अधिकाऱ्यांनी संपर्क साधून महिलेस पिवळी शिधापत्रिका मंजूर करत धान्य देण्याची व्यवस्था केली तर श्रावणबाळ वृद्धपकाळ योजनेतून दरमहा १ हजार ५०० रुपयांचे वेतन मंजूर करण्यात आले.

समाजाप्रती आपलेही काही देणे लागते ही भावना मनी वृद्धिंगत करून सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळते. या संधीचे सोने करत प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

अहमदनगर जिल्हा प्रशासनाचे होत आहे कौतूक

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे 93 वर्षीय एकल महिलेला शासनाच्या योजनेचा तातडीने लाभ मिळाला. अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना पगारे (Archana Pagare) व संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विशाल नाईकवाडे (Vishal Naikwade) या दोन्ही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या आदेशाचे तातडीने 93 वर्षीय एकल महिलेला शासकीय योजनेचा लाभ देत न्याय दिला, जिल्हा प्रशासनाच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.