राज्यातील हजारो कृषी सहाय्यकांना मिळाला न्याय, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सरकार घेणार 15 दिवसांत महत्वाचा निर्णय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्यातील कृषी सहाय्यकांच्या पदनामाबाबत आमदार प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी सहायक या पदनामात बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्याचा निर्णय येत्या 15 दिवसांत सरकारकडून घेण्यात येईल असे ठोस अश्वासन दिले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्वाचा प्रश्न निकाली निघाला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कृषी विभागात कार्यरत असलेल्या हजारो कृषी सहाय्यकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Thousands of agricultural assistants in the state got justice, due to the follow-up of MLA Prof. Ram Shinde, the government will take an important decision in 15 days.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या शेवटच्या टप्प्यात आले आहे. विधानपरिषदेत आज 23 मार्च प्रश्नोत्तराचा तास पार पडला. यात आमदार प्रा राम शिंदे यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी विविध प्रश्ने उपस्थित करत विविध खात्यांच्या मंत्र्यांकडून उत्तरे घेतली. राज्यातील कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषि अधिकारी करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेकडून सातत्याने सरकारकडे होत होती. या मागणीची आमदार प्रा.राम शिंदे यांनी दखल घेत विधानपरिषदेच्या आजच्या कामकाजात आमदार प्रा राम शिंदे यांनी कृषी सहाय्यकांच्या पदनामाबाबतचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता.

आमदार प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्याचे कृषि मंत्री अब्दूल सत्तार यांनी उत्तर दिले. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, कृषी सहायक “ या पदनामात बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी “ असा बदल करण्याचा निर्णय येत्या १५ दिवसात घेणार असे अश्वासन यावेळी त्यांनी बोलताना दिले. कृषिमंत्र्यांच्या या अश्वासनामुळे राज्यातील हजारो कृषि सहाय्यकांचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे राज्यातील कृषि सहाय्यकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कृषि विभागाचा नवीन आकृतिबंध करताना कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक या संवर्गाची पदे कमी न करता त्यात राज्याचे कृषि आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आकृतिबंधाच्या सभेत संघटनेने सुचवल्याप्रमाणे वाढ करण्यात यावी. सुधारीत आकृतिबंधामध्येच कृषि सहाय्यक यांच्या पदनामात बदल करून ते ‘सहाय्यक कृषि ‘अधिकारी’ असे प्रस्तावित करण्यात यावे अशी संघटनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आमदार प्रा राम शिंदे यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन हा विषय विधानपरिषदेत उपस्थित केला. कृषिमंत्र्यांनी आमदार शिंदे यांच्या मागणीची तातडीने दखल घेतली. यामुळे राज्यातील हजारो कृषि सहाय्यकांना न्याय मिळाला आहे.

कृषि सहाय्यकाचे पदनाम सहाय्यक कृषि अधिकारी करावे ही गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न होता. महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करत होती. आमच्या संघटनेच्या मागणीची दखल घेत आमदार प्रा राम शिंदे यांनी विधानपरिषदेत आमचा महत्वाचा प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे अश्वासन देण्यात आले.आमदार प्रा.राम शिंदे साहेबांमुळे आमचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला. संघटनेच्या वतीने आमदार प्रा.राम शिंदे साहेब, कृषि मंत्री अब्दूल सत्तार साहेब आणि सरकारचे मनापासुन आभार  – संदिप केवटे, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना

कृषि सहाय्यकाचे पदनाम सहाय्यक कृषि अधिकारी करावे ही गेल्या गेल्या आठ ते दहा वर्षांपासूनची मागणी होती. आमदार प्रा.राम शिंदे साहेबांनी आमच्या जिव्हाळ्याच्या मागणीकडे जातीने लक्ष घालत आम्हाला न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार प्रा.राम शिंदे साहेब, कृषि मंत्री अब्दूल सत्तार साहेब आणि सरकारचे मनापासुन आभार –  वैभव साळवे, तालुकाध्यक्ष- कृषि सहाय्यक संघटना, जामखेड