‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मिळाले मोठे यश, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : प्रिंट मीडियाप्रमाणे आता ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंगळवार, ३० मे २०२३ रोजी पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या साठी वर्षभर  ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने आंदोलन केले होते.

struggle of 'Voice of Media' got great success, Maharashtra government took big decision, electronics, digital, radio establishments were included in category of working journalists,

ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांमधील पत्रकारांच्या विंग ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या छत्राखाली तयार करण्यात आल्या होत्या. या विंगच्या वेगवेगळ्या बैठकींचे आयोजन करीत या क्षेत्रात काम करणाऱ्यांना श्रमिक पत्रकारांचा दर्जा देण्याची मागणी करणारा ठराव पारीत करण्यात आला होता. हा ठराव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या मुद्द्यावर पाठपुरावा केला होता. ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकारांच्या श्रेणीत समावेश करावा, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने शिंदे-फडणवीस सरकारकडे केली होती.

struggle of 'Voice of Media' got great success, Maharashtra government took big decision, electronics, digital, radio establishments were included in category of working journalists,

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेकडुन सातत्याने होणारा पाठपुरावा बघता केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने राज्यात नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहे. त्याअनुषांगाने राज्यातील ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल मीडिया, रेडिओ या आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.

आनंद आणि आभाराचा क्षण

पत्रकारांसाठी सुरू केलेल्या लढ्याला मिळालेले हे मोठे यश आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक समस्या आतापर्यंत सोडविण्यात आल्या आहेत. राज्यात ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल मीडिया, रेडिओ आस्थापनांना श्रमिक पत्रकारांच्या वर्गवारीत समाविष्ट केल्याबद्दल आनंद आणि सरकारचे आभार, अशी भावना व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे यांनी व्यक्त केली.

नव्या क्रांतीची नांदी

बदलत्या काळानुसार नव्या क्षेत्रातील पत्रकारांचा प्रवाहात समाविष्ट करू घेणे गरजेचे होते. त्यानुसार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने उभारलेल्या लढ्याला आता यश मिळाले आहे. त्याबद्दल सरकार आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आभार. सरकारने घेतलेला निर्णय नव्या क्रांतीची नांदी आहे, अशी भावना व्हाईस ऑफ मीडिया टिव्ही विंग विभागाचे प्रदेशाध्यक्ष विलास बडे यांनी व्यक्त केली.

रेडिओ क्षेत्राला न्याय मिळाला

स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ वर्षांपासून रेडिओ माध्यमातील लोकांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने यासंदर्भात एक लढा उभारला आणि रेडिओ क्षेत्रातील प्रतिनिधींना पत्रकार दर्जा प्राप्त झाला. याबद्दल सरकारचे आभार आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सामूहिक प्रयत्नांच्या यशाबद्दल आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया व्हाईस ऑफ मीडिया रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद यांनी व्यक्त केली.

डिजिटल युगाचा प्रारंभ

डिजिटल मीडियातील पत्रकारांना आतापर्यंत कोणतीही मान्यता नव्हती. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने यासंदर्भात आवाज बुलंद केल्यानंतर आता सरकारने त्यांना श्रमिक पत्रकारांच्या यादीत समाविष्ट केले आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याचे हे मोठे यश आहे, राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे डिजीटल युगाचा नवा प्रारंभ आहे, अशी प्रतिक्रिया व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विंगचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी व्यक्त केली.

ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश व्हावा यासाठी व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर आणि संघटनेचे राज्यभरातील हजारो सदस्यांनी उभारलेला लढा यशस्वी ठरला आहे. सरकारने व्हाईस ऑफ मीडियाने केलेल्या मागणी दखल घेतली. डिजीटल मीडियात काम करणाऱ्या लाखो पत्रकारांना राज्य सरकार दिलेला न्याय महाराष्ट्राच्या पत्रकारितेत डिजीटल क्रांती आणणारी ठरणार आहे. सरकारचे मनापासुन आभार. हा निर्णय व्हावा याकरिता लढणारे व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या सर्व विंगचे पदाधिकारी आणि सदस्यांचे मनापासून अभिनंदन, अशी भावना व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विंगचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सत्तार शेख यांनी व्यक्त केली.